Booster Dose
| |

बूस्टर डोस कधी घ्यालं?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगभरात कोरोना नामक विषाणूच्या संसर्गाने कहर केल्यानंतर प्रत्येक देशाने कोरोनाला प्रतिबंध घालणाऱ्या लसीकरणास सुरुवात केली. यानंतर परिस्थिती आटोक्यात येतेच तोच कोरोनाचा नवा व्हेरियंट काही समजण्याआधीच देशात हातपाय पसरू लागला. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन २५ डिसेंबर २०२१ रोजी शनिवारी संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देणार असल्याचे सांगितले.

– माहितीनुसार, हे बूस्टर डोस १० जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात येतील. तसेच ६० वयोवर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आणि ज्यांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत असे लोकदेखील १० जानेवारीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिकॉशन डोस घेऊ शकतील.

भारत बायोटेकचे क्लिनिकल लीड डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, भारतात बूस्टर डोसची घोषणा करण्यात आली आहे. लसीच्या दुसर्‍या डोसनंतर, तिसरा डोस दीर्घ अंतराने अधिक प्रभावी ठरतो. कारण तो जास्त काळ प्लाझ्मा आणि मेमरी सेल तयार करतो. म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती जास्त काळ टिकते. सध्या सर्वत्र एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे कि, बूस्टर डोस कधी घ्यावा? तर जाणून घ्या उत्तर खालीलप्रमाणे:-

० बूस्टर डोस कधी घ्यावा?
– डॉ रॅशेस एला यांनी सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्याकरिता ६ महिन्यांचं अंतर योग्य आहे. कारण हे अंतर आणि अश्या पद्धतीने घेतलेला डोस ओमिक्रॉनचा धोका कमी करण्यास मदत करतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *