hair brush

केसांसाठी हेअर ब्रश वापरताना ….

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या सौदर्यासाठी आपण दररोज केस हे विंचरतो केस विंचरताना कमीत कमी आपले केस तुटले जाणार नाहीत इतकी काळजी घ्यायला पाहिजे. केस सुंदर करताना दररोज काही चुकांचा परिणाम आपल्या केसांना भोगावा लागू शकतो. चुकीच्या पद्धतीने जर आपण केस विंचरले तर त्यावेळी आपले केस हे तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ज्यावेळी आपण ब्रश किंवा कंगवा  आपल्या केसांसाठी वापरतो. त्यावेळी मात्र खूप काळजीपूर्वक वापरला गेला पाहिजे. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या टिप्स वापरणे गरजेचे आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

केसांना मुळापासून टोकापर्यंत ब्रश करणे —-

केस ब्रश करताना बऱ्याच जणी नकळत कंगवा अथवा हेअर ब्रश केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत फिरवतात. ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण यामुळे केसांमध्ये झालेल्या गुंत्यामध्ये कंगवा अथवा ब्रश अडकतो आणि केस ओढले जातात. त्यामुळे केस हे जास्त प्रमाणात तुटले जातात. अश्या वेळी तुम्ही तुमच्या केसांना कंगवा वापरत असाल तर त्यावेळी मात्र मोठ्या दातांचा कंगवा वापरणे गरजेचा आहे. ज्यावेळी तुम्ही केस विंचराल त्यावेळी मात्र आपल्या केसांच्या मुळापासून त्याची सुरुवात करा. आणि हळू हळू केस रिकामे करा.

केसांसाठी चुकीचे हेअर टूल्स वापरणे —-

अनेक वेळा असे होते कि , आपण आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारचे टूल्स वापरणे गरजेचे आहे . ते माहीतच नसते. आपले केस जर लांब आणि जाड असतील तर त्यावेळी मात्र केसांना मोठ्या दातांचा कंगवा वापरणे गरजेचा आहे.केस विंचरण्याठी लागणारे कंगवे, पिन्स, क्लिप्स, हेअर बॅंड आणि हेअर ब्रश यांची रचना निरनिराळ्या केसांच्या प्रकारानुसार केलेली असते. त्यामुळे तुमच्या हेअर टाईपनुसार हे टूल्स निवडा. जसं की फ्रिझी केसांसाठी मोठ्या दातांचा कंगवा, पातळ केसांसाठी सॉफ्ट ब्रश अशी निवड करा.

केस धुण्याआधी केस न विंचरणे —-

अनेकांना केस धुण्याच्या पूर्वी केस न विंचरायची सवय असते. अश्या वेळी ती सवय मात्र त्यांच्यासाठी धोका बनत जाते. केस विंचरताना केस सुट्टे करून घ्या . त्यांतरचा आपण केस हे विंचरू शकतो. केस धुण्याआधी केस विंचरणे हे गरजेचे आहे. मात्र ही स्टेप अनेक जण विसरतात. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये गुंता होतो आणि केस धुताना केस मोठ्या प्रमाणावर गळतात. यासाठी केस धुण्यापूर्वी केसांवर ब्रश फिरवा ज्यामुळे केसांचा गुंता सुटेल आणि केस व्यवस्थित धुता येतील.

केस विंचरलेला कंगवा हा स्वच्छ करणे आवश्यक आहे. —-

हेअर ब्रश अथवा कंगवा वेळच्या वेळी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. आपला कंगवा हा आपल्या डोक्याच्या भागाला लागला जातो. त्या भागातील घाण हि कंगव्याच्या साह्याने निघाली जाते. त्यामुळे कंगवा हा धुतला जावा. ज्याने करून डोक्यातील घाण हि निघून जाण्यास मदत होऊ शकते. अनेक वेळा आपण बाहेर फिरत असतो अश्या वेळी डोक्यातील धूळ काढणे गरजेचे आहे.