| |

मेडिटेशन कधी कराल? कॉफीआधी कि नंतर?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांच्या गुड मॉर्निंगची सुरुवात बेडमध्येच चहा नाहीतर कॉफी पिण्यापासून होते. तर काहींची सुरुवात मात्र योगाभ्यास, ध्यानधारणा, व्यायाम नाहीतर घरगुती कामांपासून होते. पण यातही काहीजण असे असतात जे चहा, कॉफी पिऊन झाल्यानंतर योग किंवा मेडिटेशन करतात. मुख्य म्हणजे, मेडिटेशन कधी करावं, ते करण्याआधी किंवा केल्यानंतर चहा, कॉफी प्यावी का नाही याबाबत अनेकांची अनेक मते असतात. ज्याचा थेट परिणाम मानवी बुद्धीवर होत असतो. त्यामुळे अनेकजण अजूनही याबाबत संभ्रमित आहेत. मात्र मेडिटेशनआधी कॉफी पिण्याचे काही विशेष लाभ आहेत. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र मेडिटेशननंतरही कॉफी पिण्यास हानिकारक म्हणता येणार नाही. चला तर जाणून घेऊयात फायदे

१) चांगली सवय – आपण सारेच जाणतो कि, कॉफी प्यायल्याने माईंड एकदम रिफ्रेश होते. त्यामुळे मेडिटेशन व कॉफी हे एकदम उत्तम ट्रिगर आहे. यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी कॉफी आणि मग मेडिटेशन म्हणजे मूड कसा… ? एकदम टकाटक… याशिवाय मुख्य बाब काय तर मेडिटेशनवर लक्ष केंद्रित झाल्याने एक चांगली सवय अंगवळणी पडते. परिणामी मेडिटेशनची आवड निर्माण झाल्यानंतर हळू हळू शारीरिक प्रक्रियांमध्येही सुधार जाणवतो.

२) रिफ्रेशमेंट – कॉफी प्यायल्यावर मेडिटेशन केल्यामुळे मूड फ्रेश आणि विचार हायबूस्ट होण्यास मदत मिळते. कारण कॉफीमध्ये कॅफिन असते. ज्यामुळे डोपामाइन रिलीज होऊन डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात. इतकेच काय तर मनदेखील रिफ्रेश झाल्यासारखे वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर येणारी मरगळ आणि थकवा अगदी सहज दूर होतो.

३) मस्त मूड – मेडिटेशन करण्यापूर्वी कॉफी प्यायल्यामुळे डोळ्यांवर आलेली झोप लगेच दूर होते. ज्यामुळे मूड चांगला होतो आणि मेडिटेशन करताना मन शांत राहते. तसंच मानसिक स्वास्थदेखील सुधारतं.

४) कॅफीनमुळे एकाग्रता वाढते – कॉफीमध्ये कॅफिन असते आणि कॅफीनमुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे कुणीही अगदी बराच वेळ मेडिटेशन करु शकते.