| |

केसांच्या पोतानुसार कोणता हेअर ब्रश वापरावा?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या सौंदर्याचा संबंध आपल्या त्वचेइतकाच आपल्या केसांशी देखील असतो. त्यामुळे जितकी काळजी त्वचेची घेता तितकीच काळजी निश्चितच केसांची देखील घ्यायला हवी. जसे कि, त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेशी संबंधित सौंदर्य उत्पादने वापरणे गरजेचे आहे. अगदी तसेच केसांच्या पोतानुसार केसांसाठी वापरली जाणारी उत्पादने आणि केस विचारण्यासाठी वापरला जाणारा ब्रश असणे गरजेचे आहे. कारण केसांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी केसांना नियमितपणे विंचरणे, तेल लावणे, नैसर्गिक हेअर मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय केसांचा जसा पोत असतो तसाच हेअर ब्रश निवडणे काहीसे कठीण असले तरीही गरजेचे आहे. मुख्य म्हणजे सगळेच हेयर ब्रश सारखेच वाटतात त्यामुळे आपल्यासाठी अचूक हेयर ब्रश कसा निवडावा असा प्रश्न उपस्थित राहतो. तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) स्ट्रेट हेअर्स (सरळ केस) – जर तुमचे केस सरळ असतील आणि त्यांचा व्हॉल्युम कमी असेल पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल तर राउंड म्हणजेच गोलाकार आकारातील ब्रश तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या ब्रशला Boar – Bristle ब्रश असे म्हणतात. हा ब्रश नायलॉनच्या ब्रशपेक्षा जास्त सॉफ्ट असतो. ज्यामुळे आपल्या केसांना फाटे फुटणे बंद होते आणि परिणामी केसांचा वोल्ह्यूम वाढतो.

२) वेव्ही हॅअर्स (नागमोडी केस) – जर तुमचे केस वेव्ही असतील आणि तुम्हाला तुमचे केस ब्लो ड्राय करायचे असतील तर यासाठी Nylon – Bristle ब्रशचा वापर करावा. यामुळे केसांचे वळणही व्यवस्थित राहते आणि केसांचा पोत बिघडत नाही.

३) कर्ली हेअर्स (कुरळे केस) – कर्ली अर्थात कुरळ केस सांभाळणे जणू मोठे आव्हानच वाटते. कारण यांसाठी विशेष ब्रश किंवा वापरणे गरजेचे आहे. अन्यथा केसांमध्ये गुंता होणे, केस तुटणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. अश्या केसांसाठी मोठ्या दातांची Bigg Teeth Brush फणी वापरा. म्हणजे केस फ्रिझी होणार नाही आणि तुटणारही नाहीत.

४) हेवी लॉन्ग हेअर (जाड आणि लांब केस) – जाड आणि लांब केसांसाठी Paddle या ब्रशचा वापर करावा. कारण हा ब्रश सगळ्या प्रकारच्या केसांसाठी विशेषतः जाड आणि लांब केसांसाठी उत्तम ठरतो.

५) शॉर्ट हेअर (आखूड केस) – जर तुमचे केस लहान वा आखूड असतील आणि त्यांची वाढ होत नसेल तर या केसांची काळजी घेण्यासाठी लहान राऊंड ब्रश उत्तम ठरेल. यामुळे केस मऊ राहतील शिवाय आकारहीन होणार नाहीत.