Which Perfume is Best
|

परफ्युम ची निवड करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । पूर्वीच्या काळात पर्फ्युमचा वापर केला जात होता पण त्यामध्ये अत्तराचा समावेश हा जास्त प्रमाणात केला जातो. अत्तर हे अशी वस्तू आहे कि त्यामुळे आपल्या शरीरातील दुर्गंध हा इतर लोकांना कळू शकत नाही. अनेकांना वेगवेगळे परफ्युम वापरायला आवडते. परफ्युम चा वापर हा आपल्या शरीराला करताना आपल्याला कोणत्या प्रकारची ऍलर्जी नाही ना याची काळजी घ्यावी लागतील. कारण परफ्युम चा वापर करताना बऱ्याच वेळा त्यामध्ये सुगंधी द्रव्य आणि काही केमिक्लस चा वापर केल्याने आपल्या शरीराला त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे अत्तराचा वापर करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही याची काळजी घायला हवी.

डार्क अत्तर –

अत्तर वापरताना जास्त डार्क असलेल्या अत्तर चा वापर हा केला जाऊ नये. त्यामुळे शरीराला खूप मोठ्या प्रमाणात वास येतो. त्याचा त्रास सुद्धा आपल्याला होण्यास सुरुवात होते. अनेक वेळा उन्हाळ्याच्या दिवसांत आपली शरीराला खूप मोठ्या प्रमाणात गरमीमुळे घाम येण्यास सुरुवात होते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. जर तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात दुर्गंधी यायला सुरुवात झाली तर मात्र चार लोकांच्यात त्यांना जायला नकोसे वाटते.

फुलांचे अत्तर –

जर तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर मात्र आपण फुलांचे अत्तर वापरू शकता. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणातही दुर्गंधी हि कमी होते. फुले हि सुवासिक असतात. त्यामुळे घामाचा वास हा अजिबात येणार नाही. वेगवेगळ्या फुलांचा वापर जर आपल्या शरीरासाठी केला तर मात्र आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. कोणतेही काम करण्याचा उत्साह हा वाढण्यास मदत करते.

मंद सुगंध अत्तर –

फळांपासून तयार करण्यात आलेले अत्तर व परफ्यूम फुलांपासून तयार करण्यात आलेल्या द्रव्याच्या तुलनेत मंद सुगंध देणारे असतात.
उन्हाळ्याच्या दिवसात त्यांचा तो मंद सुगंध दिवसभर दरवळतो. हा अत्तर स्त्रियांसाठी जास्त लाभकारक असतो.स्त्रियांना जास्त उग्र वास असलेली फुले आवडत नाहीत. तशी सुगंधी द्रव्ये सुद्धा महिलांना आवडत नाही. रोजमेरी, लॅव्हेंडर, क्युमिन, कापूर आणि अन्य
वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले परफ्यूम मंद सुगंध देतात. रसाळ आणि चटकमटक स्वरूपात त्यांची पॅकिंग केली जाते.

वुडी अत्तर –

दरवेळी बाजारात नवीन अत्तराचा समावेश केला जातो. वुडी अत्तर भडक नसतात. त्यामुळे त्यांचा सुगंध डोकेदुखीदायक ठरत नाही. रसाळ फळांपासून त्याची निर्मिती करण्यात येत असल्याने दुसऱ्यांनाही त्याचा सुगंध सुखद अनुभव देणारा ठरतो.ज्यांना परफ्यूमच्या बाबतीत जास्त प्रयोग करण्याची इच्छा नसते त्यांच्यासाठी ऑरेंजी सुगंध देणारा परफ्यूम उत्तम पर्याय ठरू शकतो. पुरुषांनी आपल्या
शरीराला उग्र पद्धतीचा किंवा जास्त वास असलेल्या परफ्युम चा वापर केला तरी चालू शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *