| |

मुरमुरे खाणार त्याला चवीसोबत आरोग्यवर्धक फायदे मिळणार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| मुरमुरे म्हटलं का सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती भेळ.. आहाहा… मुरमुरे आणि मस्त कांदा, टोमॅटो, लिंबू बस एवढं मिळालं की माणूस कसा खुश. पण हेच चटपटीत आणि कुरकुरीत मुरमुरे आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहेत, हे माहीत आहे का? आता तुम्ही म्हणाल छे! कसं शक्य आहे. पण हे खरोखरच सत्य आहे. खरंच मुरमुरे हे खाण्याचे आरोग्याला खूप फायदे होतात.

मुळात १०० ग्रॅम मुरमुऱ्यांमधे ९० ग्रॅम कर्बोदकं असतात, जे शरीरास ऊर्जा देतात. वजनाला अतिशय हलके असलेले मुरमुरे हाडांची ताकद वाढवायलासुद्धा मदत करतात. इतकेच काय तर, वजन कमी करण्यासाठीदेखील मुरमुरे खाणे फायद्याचे असते. कसं आहे.. भूक लागली आणि कायतरी खायचं म्हणाल तर मुरमुरे एकदम बेस्ट. एकंदर काय तर, एक पौष्टिक खाऊ म्हणून मुरमुऱ्यांचा नक्कीच विचार करता येतो. हे चविष्ट मुरमुरे महाराष्ट्र, बिहार, कलकत्ता, छत्तीसगड, ओरिसा, गुजरात या राज्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

० पौष्टिकतेची हमी.
– मुरमुऱ्यांमधे भरपूर प्रमाणात कर्बोदकं, प्रथिनं, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह असे घटक समाविष्ट असतात. शिवाय मुरमुऱ्यांमधे आरोग्यास अपायकारक असे कोणतेच वाईट फॅटस आणि कोलेस्ट्रॉल नसते आणि त्यामुळे मुरमुरे खाल्ल्याचा आरोग्यास जास्त फायदा होतो.

० मुरमुरे खाण्याचे फायदे

१) अशक्तपणा निघून जातो.
– मुरमुरे पौष्टिकतेसाठी खावेत असं आहारतज्ज्ञ म्हणतात. १०० ग्रॅम मुरमुऱ्यांमधे ९० ग्रॅम कर्बोदकं असतात. ज्यामुळे शरीरास ऊर्जा प्राप्त होते. शरीरास कर्बोदकं मिळाले की साहजिकच ऊर्जा येते आणि थकवा दूर होतो. जर आपण रोज १०० ग्रॅम मुरमुरे खाल्ले तर आपल्याला शारीरिक अशक्तपणा जाणवत नाही.

२) पचनक्रियेत सुधार
– मुळात मुरमुऱ्यांमध्ये तंतुमय पदार्थ समाविष्ट असतात जे पचनक्रियेशी संबंधित सर्व समस्यांवर प्रभावी असतात. त्यामुळे पचनक्रियेस मुरमुरे चालना देतात आणि कार्यप्रणालीत सुधार करतात.

३) पोटाच्या समस्यांवर प्रभावी
– मुरमुऱ्यात तंतूमय घटक समाविष्ट असतात. त्याचा आतड्यांना खूप फायद होतो आणि पोटासंबंधीच्या समस्या साहजिकच दूर होतात.

४) बद्धकोष्ठतेवर परिणामकारक
– मुरमुरे खाल्ल्यास बध्दकोष्ठता जाणवत नाही. जर सकाळी पोट दुखण्याची किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर मुरमुरे खाणे अतिशय फायदेशीर ठरते. कारण, मुरमुऱ्यांमधे असणारे चांगले जिवाणू बध्दकोष्ठता होऊ देत नाही.

५) हाडे मजबूत होतात.
– वजनाला अतिशय हलके असलेले मुरमुरे आपल्या हाडांची ताकद वाढवायला मदत करतात. हाडं जर बळकट नसतील तर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तज्ज्ञ सांगतात, दुधासोबत १०० ग्रॅम मुरमुरे खाल्ले तर त्यातून ब, ब१ आणि ब२ ही महत्त्वाची जीवनसत्त्वं मिळतात. शिवाय मुरमुऱ्यांमधे मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते ज्याचं थेट फायदा आपल्या दात आणि हाडांच्या मजबूतीला होत असतो. म्हणूनच हाडांच्या आरोग्यासाठी दुधासोबत मुरमुरे खाणे लाभदायक ठरते.

६) रक्तदाबावर नियंत्रण
– मुरमुऱ्यांमधे सोडियम भरपूर असतं. त्याचा फायदा रक्तदाबासंबंधीच्या विकारांवर होतो. मुरमुऱ्यांमधील सोडियममुळे रक्तदाब नियंत्रित राहते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असलेल्ल्यांना आहारतज्ज्ञ्स मुरमुरे खाण्याचा सल्ला देतात.

७) वजन कमी करण्यास मदत करतात.
– वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाणं लाभदायक ठरतं. कारण मुरमुरे खाल्ल्याने पोट लवकर भरतं शिवाय दीर्घकाळ भूक लागत नाही. त्यामुळे जंक फूड खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकतो. परिणामी वजन नियंत्रित करता राहते.