Why are parents always busy?
|

नेहमीच तर आई बाबा व्यस्त असतात, असे का ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल प्रत्येक व्यक्तीला आपले करियर हे खूप महत्वाचे वाटते. करियर जर व्यवस्थित झाले नाही तर तर मात्र आपले आयुष्य वाया गेले हा एका समज प्रत्येकाचा झाला आहे . त्यामुळे प्रत्येकजण आपले करियर करण्यात खूप बिझी आहे . ना कोणाला कोणी वेळ देऊ शकत कि नाही कोणासोबत वेळ घालवू शकत. अशा वेळी जर आपल्या घरात छोटी मुले असतील तर …. त्यांच्या भविष्याशी हा खूप मोठा खिलवाड असतो. मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांकडून अनेक गोष्टींसाठी अपेक्षा असतात . त्यामुळे आपल्या घरात जर छोटी मुले असतील तर मात्र थोडा विचार करून मुलांसाठी वेळ द्यावा .

अनेक वेळा पाळणाघरातील मुलांशी संवाद साधला असता , आमचे आई – बाबा सतत कामात असतात . त्यांना ऑफिस चे काम खूप असते . असे काहीसे ऐकायला मिळते. पण या वेळी मात्र मुलांची घुसमट होते . नेहमी बोलणारी मुले जर अचानक शांत शांत झाली असतील तर त्यांच्यापाठीमागे सुद्धा नक्कीच काहींना काही कारण असते . मुले एकटी पडली कि त्यांना अश्या समस्या या निर्माण होतात. आपल्या मुलांना फक्त आपली आणि आपलीच सवय असेल आणि कधी अचानक काही कामानिमित्त आपण त्यांच्यापासून दूर झालो तर त्यावेळी मात्र मुलांना ऍडजेस्ट करणे हे अवघड जाते.

आई किंवा वडिलांचा कोणाचाही संवाद जर आपल्या मुलांशी होत नसेल तर त्या मुलांच्या समस्या या लक्षात येत नाहीत . अशी मुले हि खूप चिडचिडी बनतात. त्यांना कोणाचेच एकूण घ्यायचे नसते . सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी हट्ट आणि राग राग- करत असतात. अश्या वेळी मुलांना आई आणि वडील दोघांच्या मदतीची गरज हि असते . एकाशी जरी संवाद झाला तरी मुलांचे निरसन होत नाही.  अशा वेळी मुलांसाठी थोडा तरी वेळ  दिला गेला पाहिजे .  इतरांचे   आई वडील   मुलांच्या जवळ पाहून  त्यांना प्रेम करताना पाहून मुले  आई वडिलांकडून अपेक्षा करतात . कि  आपले आई वडील आपल्या  सोबत असले  पाहिजेत .    माझे आई बाबा सतत बिझीच असतात. असं काहीस मुलांकडून ऐकायला मिळते. त्यामुळे  मुलांचा नेहमी विचार करून करियर  निवडा.