Why consume Chikku

का करावे चिक्कूचे सेवन ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला वेगवेगळ्या पदार्थांची आणि घटकांची गरज हि जास्त असते. वेगवेगळ्या फळांचा आणि पालेभाज्यांचा वापर हा आहारात करतो. त्याप्रमाणेच चिकू सुद्धा आहारात असला पाहिजे. आहारात जर चिकूचा वापर केला ते आरोग्यासाठी अतिशय योग्य आहे . आहारात चिकू हे एका ठराविक दिवसांत असतात . ज्यावेळी चिकूचा सिझन असेल  त्यावेळी चिकू हे आहारात ठेवा. चिकूचे आपल्या आहारात असलेले फायदे कोणते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ….

—- कॅन्सरचा धोका कमी करते 

चिकूमध्ये असलेल्या व्हिटॅमिन अ आणि ब यामुळे थकवा हा जास्त जाणवत नाही. शरीरात असलेले फायबर आणि कॅल्शियम यासारख्या घटकांचा समावेश आपल्या शरीरात फक्त चिकूमुळे होते . जर नेहमी आपण कोणत्या ना कोणत्या फळांचे सेवन केले तर मात्र आपल्याला कर्करोग यासारखा आजार दूर होण्यास मदत होते .

—- डोळ्यांसाठी गुणकारी

चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या फऴामध्ये अ जीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ गुणकारी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात.

— सौंदर्य जपण्याचा गुण

आपल्या सौदर्यात वाढ करण्याचे काम हे चिक्कू करते . चिक्कू खाण्याने आपली त्वचा हि अधिक चांगली राहू शकते. त्वचेला उजळपणा येण्यास चिकू मदत करते .

— ताण दूर करण्यासाठी मदत

आजकाल कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे सतत ताण असेल त्यावेळी चिकू आहारात घ्या . त्याने ऊर्जा तर मिळतेच तसेच काही समस्या दूर होण्यास मदत होते.