manuke
|

रात्रभर भिजत ठेवलेल्या मनुक्यांचे का करावे सेवन ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । मनुके हे द्राक्षापासून बनवले जातात. द्राक्ष सुकवून त्याच्यासून मनुके बनतात. मनुके हे खूप आहारात खूप फायदेशीर असतात . मनुक्यांमध्ये पोटॅशियम , फॉस्फरस , लोह आणि फायबर याचे प्रमाण हे जास्त असते. मनुक्यांचा वापर हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थ टॉनिक मध्ये केले जाते . त्याचे उपयोग कुठे आणि कशा पद्धतीने केले जातात याची माहिती घेऊया ….

मनुके हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत . एका ग्लास भर पाण्यात जर मनुके ठेवले तर मात्र त्या पाण्यात मनुक्यांतला सगळा  रस हा मिक्स होतो. ते पाणी सकाळी सकाळी अनुश्यापोटी पिले तर मात्र  त्याचा मदतीने आपले वजन कमी कमी होत जाते . नियमित भिजवलेल्या मनुक्यांमध्ये पचन क्षमता हि जास्त असते . त्यामुळे पचायला मदत होते . मनुक्यांचा वापर हा अनेक वेगवेगळे गोड पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. मनुक्यांमध्ये बॅक्टरील गुणधर्म असतात. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या जर तुमच्या तोंडाचा खूप दुर्गंधी  वास येत असेल तर त्यावेळी मात्र दोन ते तीन मनुके खाल्ले जावेत .

भिजवलेल्या मनुक्यांमध्ये जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन हे जास्त असते . त्यामुळे नजर सुधारवायचे असेल तर दररोज आहारात काही प्रमाणात मनुक्यांचा वापर हा केला जावा. त्याच्यामध्ये असलेले कार्बोहाड्रेट्स आणि नुट्रीशन हे आपली हाडे बळकट करण्यास मदत करते . भिजवलेल्या मनुक्यांमुळे रक्ताची पातळी हि वाढते . तसेच शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते . ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे. त्या लोकांनी आहारात मनुके ठेवावीत .