|

रक्त शोषक भुणभुणणारे डास डोक्यावर का फिरतात?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणताही ऋतू असो डास, मच्छर आणि माश्या यांच्यासाठी सगळे सारखेच. पण तरीही प्रामुख्याने उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. हे डास आपल्या चाव्याने असंख्य जीवघेणे आजार पसरवत असतात. जसे कि, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया. खरंतर डास हा एक सजीव प्राणी आहे. पण हा प्राणी दया खावी इतका साधा सरळ नाही. कारण त्याचा चावा हा भयंकर जीवघेणा होऊ शकतो हे आपण सारेच जाणतो. ज्यामुळे प्रत्येकजण यांमुळे त्रस्त आहे. आपण पाहीले असाल कि, संध्याकाळ होताच डासांची फौज घरात शिरते. अगदी एखादं युद्ध सुरु असावं अशी हि डासांची फौज तुमच्या शरीरावर हल्लाबोल करते. आता या हल्ल्यापासून वाचायचं म्हणून आपण बरेच उपाय करतो. यात काहीच वाद नाही. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का कि आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर रात्रीच्यावेळी विशेष करून आपल्या डोक्यावर डास गोल गोल का फिरतात? तुम्हालाही असा प्रश्न पडलाय ना? मग चला जाणून घेऊयात यामागील कारणे खालीलप्रमाणे –

० डोक्यावर डास का फिरतात असे विचारले असता तज्ञ सांगतात कि, डासांव्यतिरिक्त असे पुष्कळ कीटक आहेत, ज्यांना डोक्यावर फिरणे आवडते. परंतु एका विशिष्ट कारणास्तव डास तुमच्या डोक्यावर उडत असतात. माणसाच्या डोक्यावर उडणारी डास हि बहुतांशी मादी असते आणि तिला आपल्या डोक्यावर फिरणे आवडते. चला तर याची कारणे जाणून घेऊया.

१) खूप घाम – डोक्यावरुन डास उडण्याचे कारण म्हणजे आपल्या केसांत येणार घाम. मानवी शरीरातून निघणाऱ्या घामाचा वास डासांना आवडतो. अनेकदा जिम किंवा कसरत करून बाहेर पडलेल्या डासांचा एक गट त्या व्यक्तीच्या डोक्याला घेरलेला दिसतो. डोक्यावर केस असल्यामुळे घाम शोषला जातो आणि याचा वास येतो जो डासांना आवडतो. म्हणून डोक्यावर डास फिरताना दिसतात.

२) सुगंधी तेल – जर तुम्ही केसांना सुगंधी तेल लावले असाल, तर तुमच्या डोक्यावर डासांची टोळी फिरणं साहजिक आहे. कारण डासांना सुगंधी तेलाचा वास प्रचंड आवडतो. खरंतर हा वास डासांना आकर्षित करतो. परिणामी डास डोक्यावर फिरताना दिसतात.

३) हेअर जेलचा वास – डासांना केसांत लावलेला हेअर जेलचा वास आणि चमक आकर्षित करते. यामुळे डास डोक्यावर फिरू लागतात.

४) कार्बन डाय ऑक्साईड – मादी डासांना कार्बन डायऑक्साईड फार आवडतो. यामुळे जेव्हा आपण कार्बन डाय ऑक्साईड सोडता तेव्हा डोक्यावरुन उडणाऱ्या मादी डासांना त्याचा गंध घेता येतो आणि यासाठी त्या डोक्यावर फिरत असतात.