| | |

हातापायाची नखं काळी का पडतात?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा पहिले असेल कि, अनेकांच्या हाताची वा पायाची नखे तुटलेली आणि काळवंडलेली दिसतात. हि नखे बहुतांशी ओबड धोबड आणि खरखरीत असतात. तसेच या नखांचा एकतर अर्धवट भाग काळवंडलेला दिसतो नाहीतर पूर्ण नखं काळं दिसतं. कधी कधी नखे काळवंडण्यामागे काही विशिष्ट कारण असू शकते. तर कधी कधी काही कारण नसतानादेखील अनेकांची नखे काळवंडतात. आता ही नखे काळवंडण्यामागे नेमके काय कारण असेल असा कुणी फारसा विचार करत बसत नाही. पण नखं आपल्या अवयवांशी संबंधित भाग असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे हे आधी समजून घ्या. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नखे का काळवंडतात याची कारणे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) नखांना होणारे इन्फेक्शन – अनेकदा नखं काली पडण्यामागे इन्फेक्शन अर्थात संसर्गाचा संबंध असतो. इन्फेक्शनमुळे नखांचा रंग बदलण्याचा धोका वाढतो. यामुळे नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा वा काळसर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून डॉक्टर उपचार ठरवतात.

२) फिट्ट पादत्राणे – अनेकदा धावण्यासाठी, पाळण्यासाठी वा चपळाईसाठी पायाला फिट्ट बसणाऱ्या चप्पलचा वापर केला जातो. यामुळे पायांना आणि विशेष करून नखांजवळील भागाला त्रास होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज किंवा चप्पल वापरू नका. अशा दुखण्यांमध्ये नख फारच काळसर दिसू लागली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैद्यकीय उपचारांच्या मदतीने डेड नेल संपूर्णपणे काढून टाकता येते.

३) अपघात – एखाद्या अपघातामध्ये वा एखादी जड वस्तू पायावर पडल्यास नखांखालील नसांचे नुकसान होते. अश्या अपघातांमध्ये नखांखालील नसा फाटल्यास रक्त साकळते आणि परिणामी नखांचा रंग बदलतो. यामध्ये तीव्र वेदना जाणवतात. दरम्यान नखाजवळील रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि काळजी घ्या.

४) स्किन कॅन्सर – काळवंडलेल्या नखांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण हे खूप मोठ्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. कारण काळवंडलेल्या नखात गंभीर प्रकारच्या स्कीन कॅन्सरचे विषाणू असतात. हा विषाणू नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलतो. या कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फार जाणवत नाहीत. त्यामुळे दुर्लक्ष होत आणि मग याचे परिणाम गंभीर होतात. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांकडे जा आणि उपचारास सुरुवात करा.