| |

भारतीय स्त्रिया जोडवी का घालतात?; जाणून घ्या कारण आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायात चांदीची जोडवी परिधान करतात. मुळात मंगळसूत्र, कुंकू आणि जोडवी याना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तर हे परिधान करणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती म्हटले जाते. तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीय संस्कृतीत अशा बऱ्याच गोष्टी नमूद केलेलया आहेत ज्या बंधने वाटत असल्या तरीही त्या प्रत्येक गोष्टीमागे काही वैज्ञानिक करणे आहेत. यांपैकी एक म्हणजे जोडवी घालणे. विज्ञान सांगतं कि, स्त्रियांची पायात जोडवी घातल्यास त्यांचे प्रजनन चक्र सुधारण्यास आणि सुपीकता वाढविण्यात मदत होते. स्त्रिया लग्नानंतर पायांच्या बोटात जोडवी घालतात. यामागील मुख्य कारण सांगताना तज्ञ सांगतात कि, पायांच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात. अधिक जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० महिला जोडवी का घालतात?
– जोडवी स्त्रियांच्या १६ शृंगारापैकी एक आहे. अशी मान्यता आहे कि, सोने आणि चांदीचे जोडवी परिधान केल्याने आत्मकारक सूर्य आणि चंद्र या दोन्हीची कृपा राहते. यामुळे धर्म ग्रंथानुसार विवाहित स्त्रियांनी जोडवी परिधान केली पाहिजे असे सांगितले जाते. परिणामी वर्षनुवर्षं जपलेल्या परंपरेचा वारसा म्हणून महिला जोडवी परिधान करतात.

० जोडवी घालण्यावर तज्ञ काय सांगतात?
– तज्ज्ञांच्या मते, लग्नानंतर घातलेले प्रत्येक दागिने महिलांच्या आरोग्याशी संबंधित असतात. आपल्या बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू आणि एक्यूप्रेशर पॉईंट्स असतात. जे जोडवी परिधान केल्यास अत्यंत प्रभावीरीत्या सक्रिय होतात. ज्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यास कुठेतरी बहुमूल्य फायदा होतो.

 

० जोडवी परिधान करण्याचे फायदे:-

१) अंगठ्याच्या मागील बोटात जोडवी परिधान केल्यामुळे सायटिका नावाच्या मज्जातंतूवर दबाव येतो. याचा फायदा असा कि, यामुळे रक्त परिसंचरण आणि मासिक पाळीचे चक्र योग्य होते आणि सुरळीतपणे चालते.

२) चांदीची जोडवी परिधान केल्यामुळे पायातील शिरा सक्रिय होतात. ज्यामुळे शरीरातील चुंबकीय क्षेत्र सुधारते. परिणामी, शरीराची नैसर्गिक कार्ये योग्यरित्या कार्य करतात आणि हार्मोनल आरोग्य देखील सुधारते.

३) याशिवाय पायाच्या तिसऱ्या बोटात जोडवी परिधान केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या सर्व वेदना कमी होतात आणि मासिक पाळीचे चक्रदेखील सुधारते.

४) पायाच्या अंगठ्या शेजारील बोटात जोडवी परिधान केल्यामुळे शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते. यामुळे शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पोहोचते आणि यामुळे बर्‍याच आजारापासून बचाव होतो.

५) पायात जोडवी परिधान केल्यामुळे स्त्रियांचे स्नायू आणि शरीरातील नसा बळकट राहतात.

६) चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात