Why do knees hurt constantly?

का दुखतात बरे सतत गुडघे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । वय जास्त झाले असेल तर गुडघा दुखण्याच्या समस्या या जास्त जाणवतात. पण आजकल कमी वयातील लोकांना सुद्धा गुडघ्याच्या समस्या या जास्त जाणवताना दिसत आहेत , त्याचे कारण म्हणजे लोकांचे बदलत गेलेले राहणीमान , लोकांच्या खाण्या – पिण्याच्या पद्धती तसेच आजकाल कामाचा असलेला व्याप त्यामुळे सतत टेन्शन आणि जेवणाच्या अवेळी वेळा यामुळे अशक्तपणा येतो. आणि थोडे जरी चालले किंवा कठीण काम केले तर मात्र गुडघा दुखी हि वाढते . त्याची अजून कोणकोणती कारणे आहेत , ती माहिती करूया……

जर वजन जास्त असेल तर ….

जर तुमच्या शरीराचे वजन हे जास्त असेल तर तुमच्या शरीराचा सगळा बोजा हा आपल्या पायांवर येतो. त्यामुळे चालताना त्रास हा निर्माण होऊ शकतो. पायाने चालताना गुडघ्याच्या समस्या या वाढताना दिसतात. त्यामुळे वजन हे नियंत्रित ठेवणे गरजेचे असते . जास्त भार हा आपल्या गुडघ्यांवर आला जाणार नाही . जर एखादे वेळी गुडघा दुखतोय हे आपल्या मेंदूला जाणवत असेल तर त्यावेळी मात्र काही कृती करणे सोडून दिले गेले पाहिजे . त्यामुळे जबरदस्तीने आपल्या शरीराला त्रास होईल अशा गोष्टी करणे सोडून दिले पाहिजे .

अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनांनुसार आपल्या आजूबाजूला जर काही लोकांचे वजन हे जास्त असेल तर त्यावेळी पाच पैकी दोन जणांना पायाच्या समस्या या जास्त जाणवू शकतात. लठठपणा यामुळे शरीरात अजिशोओर्थपेडिया असा त्रास या जास्त उदभवू शकतो.

दुखापतींवर लक्ष देणे —

जर तुमच्या पायाला कोणत्याही प्रकारची इजा झाली असेल किंवा जर काही खरचटले किंवा कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या स्वरूपात त्रास निर्माण होत असेल तर त्यावेळी मात्र आपल्या पायांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये . त्वरित त्याच्यावर इलाज करणे आवश्यक आहे . ज्यावेळी आपल्या दुखण्याचे स्वरूप हा कमी असते त्यावेळीच लक्ष दिले तर मात्र अनेक मोठ्या शस्त्रक्रिया या तुम्ही टाळू शकता. असे अनेक खेळाडू आहेत कि, त्यांना छोट्या छोट्या दुखापतींमुळे आपले मैदान सोडावे लागले आहे .

आपल्या गुडघ्यांमधील एसीएन कडे लक्ष द्या —

आपल्या शरीरातील गुडघ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यावेळी पायांच्या आणि गुडघ्याच्या मध्ये असलेली वाटती म्हंज्जे एसीएन हे हालले जाते . त्यामुळे चालताना त्रास हा जास्त होत असेल तर त्यावेळी जास्त चालू नये. या समस्या जास्त करून एकदा मैदानी खेळ खेळताना जाणवतो. ज्यावेळी फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल अशा समस्या या निर्माण होतात . त्यामुळे कोणत्याही साधारण दर्जाच्या दुखापतींकडे दुर्लक्ष केले जाऊ नये . नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे .