| | |

मास्कमुळे डोकेदुखीची समस्या का होते?; जाणून घ्या कारण आणि उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले. यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे हे सर्वानी जाणले. या विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम सुरु असली तरीही निष्काळजीपणा करून चालणार नाही हे समजून घेतले पाहिजे. कारण अजूनही हे संकट पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क परिधान करणे हि आरोग्याची गरज आहे. पण झालेय असे कि यामुळे अनेकांनी काही समस्या व्यक्त केल्या आहेत. जसे कि घट्ट बांधलेला मास्क मोठ्या कालावधीपर्यंत घातल्याने कानाच्या पाळीमागे वेदना होतात.

मास्क खालच्या जबड्याला आणि डोक्याच्या बाकीच्या भागाला जोडला जातो. यामुळे मांसपेशी आणि ऊतीमध्ये जळजळ निर्माण होते. शिवाय जबड्याला हालचाल करणे अवघड होते. जबड्याला प्रभावित करणार्‍या नसा वेदनेचा संकेत पाठवतात आणि परिणामी डोकेदुखी उदभवते. या डोकेदुखीपासून आराम कसा मिळवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

० मास्कमुळे होणार्‍या डोकेदुखीवर उपचार

१) असा मास्कचा वापर करा जो कानाच्या मागे घट्ट नसेल. कारण मास्क जास्त घट्ट असेल तर कान ओढले जातात. यामुळे नसांवर ताण येतो. यामुळे टाईट मास्क घालणे टाळा. परंतु जिथे संसर्गाचा जास्त धोका असेल अश्या ठिकाणी २ मास्क किंवा टाईट मास्कचा वापर गरजेचा आहे.

२) तणाव आणि चिंता जबड्याच्या मांसपेशी आणि दातांना जखडू शकते. यामुळे नेहमी दात आणि जबडा रिलॅक्स पोझीनमध्ये असतील याची काळजी घ्या.

३) आपले पोश्चर व्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष द्या. कारण खराब पोश्चरमुळेसुद्धा कानाच्या पाळीला त्रास होतो.

४) आपली मान स्ट्रेच करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्सरसाइज करा.

५) मास्कचा वापरानंतर गळा आणि कानाच्या पाळीला तेलाने मालिश करा.

६) जबड्याची सोपी एक्सरसाइज करा
– जीभ तोंडाच्या वर ठेवा आणि जबड्याच्या मांसपेशी मोकळ्या होतील असा जबडा हलवा.

– जबड्याचा टीएमजे लुब्रिकंट करण्यासाठी तोंड हळुहळु उघडा आणि बंद करा.

– आपले तोंड उघडे ठेवा आणि हळुहळु जबडा डावीकडून उजवीकडे असा हलवा.

० मास्क घालणे सुरक्षित आहे का?
– कदाचित काही महिन्यानंतर मास्क न घालणे सुरक्षित असू शकते. मात्र आता तरी दोन्ही व्हॅक्सीन घेतल्या असतील तरीही मास्क परिधान करणे हि आरोग्याची गरज आहे.