|

हातापायाच्या तळव्यांना घाम का येतो?; जाणून घ्या कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घाम येणे ही एक अगदी सामान्य प्रक्रिया आहे. शिवाय घाम येण्याने शरीरातील विषारी घटक घामावाटे उत्सर्जित होतात. तसे पाहता हात, पाठ आणि डोके या अवयवांवर अधिक घाम येतो. परंतु आपल्यापैकी काही लोकांच्या हातापायांच्या तळव्यांना प्रचंड प्रमाणात घाम येतो. अश्या समस्येने तुम्हीही हैराण असाल तर यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरगुती उपाय. पण तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत कि या तळव्यांना खूप घाम का येतो?

– मुख्य म्हणजे अनेक आजारांचे कारण हे आपली जीवनशैली आणि आपला दैनंदिन आहार असतो. आपल्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना घाम येण्यासही हेच घटक कारणीभूत आहेत.

१) आपल्या आहारात लसूण आणि कांदे यांचा वापर जास्त प्रमाणात असल्यामुले आपल्या तळ हातापायाच्या तळव्यांना खूप घाम येऊ शकतो. याचे कारण असे कि, लसूण, कांदे आणि मसालेदार पदार्थ घाम ग्रंथींना उत्तेजन देतात.

२) शिवाय आपल्या दैनंदिन आहारात विविध मसाले किंवा मसालेदार पदार्थ असतील तरी घामाच्या ग्रंथीना उत्तेजन मिळते आणि तळव्यांना घाम येतो.

३) अधिकवेळा कॉफी पिणे आणि धूम्रपान करणे यामुळेदेखील आपल्या तळव्यांवरील घाम ग्रंथी उत्तेजित होतात. यामुळे जर आपल्याला पीसीओएस, थायरॉईड डिसऑर्डर किंवा इतर कोणत्याही हार्मोनल समस्या असतील तर या समस्या निश्चितच तुमच्या तळव्यांना येणाऱ्या घामाचे कारण असू शकतात.

करावयाचे उपाय:-

१) जर आपला अर्ध्याहून अधिक दिवस ऑफिसमध्ये जात असेल आणि यादरम्यान तुम्ही सॉक्स – शूज घालत असाल तर आपले पाय घरी पूर्णपणे उघडे ठेवा. शिवाय, शक्य असेल तर वेळोवेळी पायातून दोन्ही शूज आणि मोजे काढा. यामुळे तळव्यांना घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. या व्यतिरिक्त पायात बॅक्टेरिया होणार नाही आणि दुर्गंध देखील येणार नाही.

२) तळव्यांना घाम येण्याची समस्या टाळण्यासाठी टोमॅटोसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. टोमॅटोचा रस नियमितपणे प्यायल्याने अनावश्यक घामाची समस्या दूर होते.

३) तळ हातांना आणि पायाच्या तळव्यांना येणार घाम दिवसेंदिवस मोठी समस्या होत असेल तर एक कच्चा बटाटा कापून घ्या आणि आपल्या हाताच्या तळव्यांवर आणि पायाच्या तळव्यांवर किमान पाच मिनिटांपर्यंत घासा. यामुळे तळव्यांना येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होईल.

४) या समस्येवर बेकिंग सोडा अतिशय प्रभावशाली काम करतो. ते हि अगदी सोप्प्या पद्धतीने. यासाठी, बेकिंग सोडयात थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या हाताला लावा. साधारण पाच मिनिटे आपल्या हातावर हि पेस्ट घासून घ्या आणि नंतर हात स्वच्छ धुवा. याचा नियमित वापर केल्याने ताल हातांना घाम येणे कमी होईल.