skin feet

पायांच्या त्वचेला का पडतात भेगा ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । प्रत्येकाला आपले पाय हे सुदंर असावे असे वाटत असते , अश्या वेळी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट या आपल्या पायांसाठी वापरत असतो. पायांच्या स्वछतेसाठी काही वेळा पालेर मध्ये जाऊन पेडिक्युअर केले जाते. त्यामुळे पायांना सौदर्य हे जास्त वाढत जाते. पायांना चिरा किंवा भेगा पडण्याची कारणे हि वेगवेगळी आहेत. पायाला भेगा या जास्त करून पावसाळ्यच्या दिवसांत पडल्या जातात. कारण आपल्या पायाचा संपर्क हा जास्त करून पाण्याशी आलेला असतो. अश्या वेळी काय काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया ….

— आपल्या चपला या नरम नसतील तर त्यावेळी आपल्याला आणि पायाला खूप जास्त प्रमाणात त्रास हा जाणवतो. अश्या वेळी आपली पादत्राणे नरम, आरामदायी घ्यावीत. भेगाळलेल्या पायांना घट्ट व कडक चपलांमुळे जास्त इजा होते.-

— पायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापणे टाळा. कापताना त्वचा खेचली गेली किंवा कात्री लागली तर जखम चिघळून संसर्ग होण्याची शक्यता असते.

— पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा चोळून लावा.

— दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा. असे केल्याने पायांना आराम वाटेल व धूळ, माती निघून जाईल.

— झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या.

— साखर आणि साय एकत्र करून त्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्या, यामुळे भेगा कमी होतील.

— मेण आणि तूप गरम करून त्याचे थेंब भेगांवर नियमित सोडावे, त्यामुळे टाचा मुलायम राहतील.

— भेगांकडे दुर्लक्ष केल्यास कोरडेपणामुळे त्या रुंदावतात व त्यातून रक्त येते. काही वेळा चालताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना नियमित स्निग्ध पदार्थाने मसाज करावा.

— अनेक वेळा जे नैसर्गिक मेण असते त्याचा वापर हा आपल्या पायांसाठी केला जावा. जे महू निसर्गतः उपलब्ध असते त्याचा वापर हा आपल्या पायांसाठी करावा.

— पावसाळ्यात पायांच्या नखांवर मॅचिंग किंवा पारदर्शक नेलकलर लावा. त्यामुळे नखांच्या कडेला माती साचून तेथे होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल,

— पावसाळ्यात शक्यतो बंद चप्पल किंवा सँडल वापरणे टाळा, बंद चपलांमध्ये ओलसरपणा राहातो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

— पावसाळ्यात सतत पाण्याशी संपर्क येत असल्याने पायाच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी पडते व गळून पडते, खाज सुटते, त्यातून रक्त येते.

— पावसाळ्यात जास्त करून पाणी आत जाणार नाही अश्या चपलांचा वापर हा करावा . त्यामुळे यासाठी चप्पल वा शूज घालण्यापूर्वी बोरिक पावडर असलेली टॅल्कम पावडर तेथे लावा. अँटिसेप्टिक मलमही लावू शकता.