Why do women gain weight during pregnancy?

गरोदरपणात महिलांचे वजन का वाढते ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । गरोदर पणात आईला विशेष काळजी हि घ्यावी लागते .गरोदर पणात आईला बाळाच्या हालचालींकडे लक्ष दयावे लागते. गरोदर पणात महिलांच्या शारीरिक स्थितीत खूप सारे बद्धल झालेले दिसून येतात. त्या काळात महिलांना वेगवेगळ्या समस्या या जाणवतात. महिलांचे आरोग्य हे त्या काळात फार बदलत असते. त्या दिवसांमध्ये जास्त थकवा जाणवतो. चेहरा हा निस्तेज पडायला सुरुवात होते चेहऱ्यावरचा रंग हा सुद्धा बदलतो. त्यामुळे त्या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. लघवीचे प्रमाण हे सुरुवातीच्या काळात जास्त असते.

महिलांच्या हालचालींमध्ये खूप सारा बदल जाणवतो. त्या काळात त्यांच्या शरीराची वाढ झालेली लक्षात येते. महिलांच्या शारीरिक समस्या या वाढतात. त्या काळात पोटाचं घेर हा वाढत असतो. सुरुवातीच्या काळात बाळाच्या वाढीला सुरुवात होते. त्यामुळे हळू हळू वजन वाढण्यास सुरुवात होते. गरोदरपणात बाळाची वाढ प्रत्येक महिन्यात वेगवेगळी असते. त्यावेळी सर्व अंगावर खाज यायला सुरुवात होते . त्यामुळे त्या काळातील सर्व रेषा महिलांच्या शरीरावर तश्याच असतात. बाळ वाढीला लागले असता, त्याचा आकार वाढतो. त्यामुळे बाळाच्या वजनात वाढ होते . हाच वजनाचा प्रभाव हा महिलांच्या शरीरावर होत असतो, त्यामुळे गरोदर पणात प्रत्येक महिलेचे वजन हे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे असते.

गरोदर नसणाऱ्या महिलांच्या गर्भाशयाचे वजन हे साधारण ५० ग्रॅम एवढे असते . आणि गर्भाशयाची उंची हि ७. ५ सेंटीमीटर एवढी असते . तर ज्यावेळी पोटात गर्भ वाढत असतो , त्या काळात महिलांच्या गर्भाशयाचे वजन हे साधारण ९०० ते १००० ग्रॅम पर्यंत वाढलेले असते , आणि त्याचा गर्भाशयाची उंची हि साधारण ३५ सेंटीमीटर एवढी वाढलेली असते. सुरुवातीच्या काळात गर्भाचे वजन हे साधारण स्थितीत वाढताना दिसून येते. आणि शेवटच्या काही आठ्वड्यामध्ये हे वजन एकसारखेच राहते . जवळपास कमीत कमी ९ ते १० किलो वजन हे गर्भाशयात बाळ असताना आईचे वाढलेले असते .