Bangles

लग्नानंतर स्त्रिया बांगड्या का घालतात?; जाणून घ्या वैज्ञानिक कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिंदू धर्मामध्ये लग्नसंस्थेला एक विशेष महत्व आहे. कारण लग्न म्हणजे केवळ एक स्त्री आणि पुरुष एकत्र येणे नव्हे तर लग्न एक भावना आहे. हि भावना जोपासणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते. आपण सारेच जाणतो कि लग्नानंतर स्त्री आणि पुरुष दोघांच्या जबाबदाऱ्या वाढतात. आर्थिक, मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक अश्या प्रत्येक जबाबदारीसाठी त्या दोघांनीही एकमेकांची साथ देणे आवश्यक असते. लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल येतात. जीन्स, टॉप घालून हुंदडणारी लेक आता साडीच्या पेहरावात सून झालेली असते. याशिवाय कपाळावर कुंकू- टिकली, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी आणि हातात बांगड्या तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होऊन जातात.

रितीरिवाजांमध्ये विवाहानंतर स्त्रियांसाठी १६ शृंगाराचे वर्णन केले आहे. यातील प्रत्येक गोष्टीचे एक वैशिष्ट्य आहे. यांपैकी एक बांगड्या. अनेकांना वाटत कि स्त्रीच्या शृंगारातील प्रत्येक गोष्ट तिला बंधनात ठेवण्यासाठी आहे. तर अश्या विचाराच्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सांगू इच्छितो कि, स्त्रीचा शृंगार तिच्यातील कमकुवतपणा नव्हे तर तिच्यातील सक्षमता दर्शवित असतो. यातील बांगड्या परीधान केल्या नाहीत तर श्रुंगार अपूर्ण वाटतो. पण, बांगड्या तिचे हात जखडून ठेवण्यासाठी नव्हे तर तिच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामूळे बांगड्या प्रत्येक वयोगटातील मुली व महिलांचा आवडता दागिना आहे.

हिंदू धर्मानुसार,
लग्नानंतर स्त्रियांनी हात रिकामे ठेवू नये. याचा अर्थ असा की, त्यांनी हातात बांगड्या घातल्या पाहिजेत. यामुळे पती- पत्नीमधीत प्रेम वाढते आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. याशिवाय असेदेखील म्हणतात की, स्त्रियांच्या हातात बांगड्या घातल्याने त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. हि धार्मिक पैलूतील मान्यता आहे.

वास्तुशास्त्रानुसार,
बांगड्यामधून निघणारा आवाज घराच्या वातावरणात सकारात्मक उर्जा प्रसारित करतो. यामुळे घरात आनंद आणि शांतीचे वातावरण कायम राहते. ज्या स्त्रिया बांगड्या परिधान करतात त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. अशा स्त्रियांच्या घराची आर्थिक स्थिती उत्तम राहते. तसेच बुध ग्रहाची अनुकूलता हवी असेल तर स्त्रियांनी बांगड्या घालणे शुभ मानले जाते.

निश्चितच धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे एक विशेष स्थान असल्यामुळे लोक या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. पण मैत्रिणींनो तुम्ही कधी बांगड्या परिधान करण्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेतले आहे का? हो हो वैज्ञानिक कारण. प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारण हे असतेच. तसेच यालाही आहे. जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

बांगड्या घालण्याचे वैज्ञानिक कारण..