Why do you feel sleepy all the time?

सतत झोप आल्यासारखे का वाटते ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी पुरेशी झोप हि फार गरजेचे आहे. झोप जर पूर्ण झाली तर मात्र कोणत्याही आजारांचा सहसा धोका हा निर्माण होत नाही. सतत झोप आल्यासारखे वाटणे म्हणजे आपल्या शरीरात काही गोष्टींची कमतरता असणे. झोप आल्यासारखे वाटणे म्हणजे म्हणजे तुमची शारीरिक स्थिती हि अजिबात योग्य नसणे होय. सतत झोप आल्यासारखे वाटणे म्हणजे नेमके काय आणि त्याची कारणे कोणती ते जाणून घेऊया …..

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यां असतील तर, मात्र तुम्हाला झोप आल्यासारखे वाटते.

झोप पूर्ण न होणे —-

आपल्या शरीराला किमान ७ ते ८ तास शांत झोप असणे गरजेचे आहे. साधारण झोपेचे प्रमाण हे वयानुसार ठरले गेले आहे. वय जर कमी असेल तर त्यावेळी मुलांना इतर लोकांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक असते. झोप पूर्ण घेण्यासाठी ८ तास शांत झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे अनेकांना रात्रीच्या वेळेत मोबाईल आणि टॅब चा वापर हा जास्त करत असाल तर लवकर झोप लागत नाही. कधी कधी तर आपण झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

प्रमाणापेक्षा जास्त खाणे—

आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न पचेल असे पदार्थ तेवढ्याच प्रमाणात खाल्ले पाहिजेत. सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

पुरेसा व्यायाम न करणे —

आपल्या शरीराला जितकी झोप आवश्यक आहे, तेवढ्याच प्रमाणात आपल्या शरीराला व्यायामाची सुद्धा गरज हे जास्त असते. आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी काही मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी —–

तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा —-

साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. असे पदार्थ आहारात ठेवा कि त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण हे कमी असेल . साखरेच्या पदार्थांच्या सेवनाने मरगळलेले आणि थकलेले वाटते.

ताणतणाव जास्त वाटते —

जर इतर वेळेला तुम्हाला कामाचा ताण हा जास्त असेल तर सतत झोप आल्यासारखे वाटते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जर खूप टेन्शन असेल तर त्यावेळी काही प्रमाणात खूप गाणी एका, चित्र काढा, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते करा. म्हणजे तुमचा ताण हा कमी होईल. काम करू शकाल.