| |

दुपारी जेवताना भात खाल्ला कि झोप का येते?; जाणून घ्या कारण आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भात हा असा पदार्थ आहे ज्यात एकतर भरपूर विविधता मिळते. अर्थात उत्पादनात मिळतेच पण पदार्थांमध्येसुद्धा विविधता मिळते. पहा ना व्हेज पुलाव, तवा पुलाव, जिरा राईस, कढी राईस, दालखिचडी, दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी आणि अजून बरंच काही.. त्यामुळे भट खाणाऱ्यांची एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अगदी साध्या वरणभातापासून निरनिराळ्या भाताचे प्रकार कित्येक लोक अगदी चवीने आणि मनसोक्त खातात.

पण आजकाल वाढते वजन हि इतकी मोठी समस्या झाली आहे कि, डाएटचे एक नवे फॅड आले आहे. त्यामुळे सर्रास अनेक लोक डाएट चार्ट फॉलो करताना दिसतात. मुख्य म्हणजे सहसा डाएटमधून भात स्किप करण्याचा एक वागलास अट्टाहास असतो. पण कितीही विचार केला तरी न राहवून घासभर तरी भात खाल्ला जातोच. कारण काहिंना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही. पण भट तुमच्यासाठी कितीही जीव का प्राण असेना त्याचे दुपारच्या जेवणात असणे नक्कीच महागात पडू शकते. कारण दुपारी भात खाल्ला कि खूप सुस्ती येते आणि मग सारखं आडोसा मिळावा आणि झोपून जावं असं वाटतं. काहींना ऑफिसमध्ये डब्यात भात खाण्याची सवय असते. या भात खाण्याच्या सवयीमुळे कामात व्यत्यय येतो. कारण भात खाल्ला तर झोप येणार यात काही वादच नाही. म्हणूनच आपण आधी दुपारच्यावेळी भात खाण्यामुळे झोप का येते? हे जाणून घेऊ आणि त्यानंतर झोप येऊ नये म्हणून काय करता येईल हे जाणून घेऊ.

० दुपारी भात खाण्यामुळे झोप का येते?
– मुळात भातात कार्ब्स आणि ग्लुकोज अधिक असते. त्यामुळे भात खाण्याने इन्सुलीनची पातळी वाढते. ज्याचा परिणाम थेट मेंदू्च्या कार्यप्रणालीवर होतो. शिवाय शरीरात हॉर्मोनल बदल होतात आणि झोपेच्या हॉर्मोन्सला चालना मिळते. म्हणूनच दुपारी असे नव्हे पण कधीही भात खाल्ल्यात तरी आळस येतो. सुस्ती येते आणि मग झोप येते. मुळात भात जेवल्यावर झोप येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे यात घाबरण्याचे कारण नाही. मात्र दुपारी जर तुम्ही भात खाणार असाल तर तुम्हाला काम करताना झोप येते परिणामी कामात अडथळा येतो.

० दुपारी भात खाताना काय काळजी घ्यावी?
– तुम्हाला भात आवडत असेल तर निश्चितच तुम्ही त्याबाबत आग्रही असाल. त्यामुळे भात खा पण काही गोष्टींची काळजी घ्या म्हणजे दुपारची झोप नियंत्रणात राहील. यात मुख्य म्हणजे भात खाण्याचे प्रमाण कमी असावे. कारण प्रमाणात भात जेवल्यास झोप येत नाही. शिवाय जितका जास्त भात खाल तितका पचनशक्तीवर जास्त ताण येईल. परिणामी झोप येण्याची शक्यता वाढेल. यासाठी दुपारच्या जेवणात पोळी- भाजी, भाकरी, डाळ, पराठा, दही, सलाड यांचा समावेश करा. मात्र भात अतिशय थोड्या प्रमाणात खा.