Why does a baby need enough sleep?

बाळाला पुरेशी झोप का आहे आवश्यक ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपली मुलांच्या आरॊग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते . त्याचा आहार तसेच खाण्या-पिण्याच्या सवयी यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. लहान बाळाने पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण यामुळे त्यांचा मुड रिफ्रेश राहतो आणि शारीरिक व मानसिक विकास देखील चांगला होतो. लहान मुलांनी जर योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर मात्र त्यांचा मूड हा ठीक राहत नाही. त्यांची सतत चिडचिड होत असते .

बाळासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. बाळाला जितका जास्त आराम मिळेल तेवढे बाळ चांगल्या स्थितीत आणि सुदृढ राहील. पण आपण अशी अनेक लहान बाळं पाहतो जी खूप झोपतात पण तरी देखील त्यांना दिवसभर सुस्ती असते. लहान वयातील बाळाला खाऊ खायला दिल्यानंतर त्यांना लगेच सुस्ती येते. लहान मुलांच्या झोपण्याच्या वेळा या खूप  वेळ असतात. पण लहान मुले सतत झोपेतच असतील तर मात्र मुलांच्या आरोग्यसाठी ते अजिबात योग्य नाही . कारण इतके झोपूनही त्यांना जर फ्रेश वाटत नसेल तर मात्र त्यांना कोणत्या तरी आरोग्याच्या समस्या आहेत. हे लक्षात येते.

जेव्हा लहान बाळ गाढ झोपते आणि त्याची झोप पूर्ण होते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम त्या बाळावर दिसून येतो. बाळाच्या वाढीला झोप हि खूप फायदेशीर राहते . मेडिकल रिसर्च मधून हे दिसून आले आहे की गाढ झोप घेतल्याने शरीरात ग्रोथ हार्मोन्स खूप सक्रीय होतात. बाळ जेवढी चांगली झोप घेईल तेवढी त्याची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. आणि त्याच्या वाढीला सुद्धा पोषक वातावरण तयार होते . अनेक आजरांच्या विरोधात लढण्यास बळ हे झोपेमुळे मिळते .