Why does an unplanned cesarean have to be done?

अनियोजित सिझेरिअन हे का करावे लागते ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  गरोदर असताना नेहमी स्त्रियांना खूप काळजी हि घ्यावी लागते . गरोदर मध्ये असताना कमीत कमी जेवणाच्या वेळा आणि गोळ्या यांचे नियोजन हे योग्य असणे आवश्यक असते . तुम्ही जर गरोदर मध्ये नॉर्मल प्रसूती व्हावी असा विचार करत असाल तर मात्र आपल्या दैन्यंदिन जीवनातल्या काही वेळा बदलल्या गेल्या पाहिजेत . कधी कधी तुम्हाला सी-सेक्शन सिझेरियन करावे लागत नैसर्गिक प्रसूतीसाठी तर मात्र खूप काळजी हि घ्यावी लागते . कधी कधी अचानक सुद्धा सिझेरिअन करण्याची वेळ हि येऊ शकते . त्यामुळे मनाची तयारी असणे खुप आवश्यक आहे .

अचानक सिझेरियन का करावे लागते?

अचानक कराव्या लागणाऱ्या सी-सेक्शन -सिझेरियन मधील काही गुंतागुत असेल तर अशा वेळी  बाळाला आणि आईला जर धोका असेल तर अशा वेळी सुद्धा अचानक सिझेरिअन हे करावे लागते .

— नाळे विषयक समस्या

काही वेळा बाळाच्या नाईबाबत समस्या निर्माण होतात, जसं नाळ बाळाच्या मानेला गुंतली जाते त्या वेळी मात्र बाळाच्या आरोग्याला धोका हा निर्माण होऊ शकतो. अश्यावेळी सी-सेक्शन करावे लागते. नाहीतर बाळाला श्वास,घ्यायला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तातडीने लगेच सिझेरिअन हे करावे लागते .

—- गर्भवेष्टनातबाबत निर्माण झालेला समस्या

गर्भ हा जर योग्य ठिकाणी नसेल तर बाळाच्या आरोग्याच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. बाळाची काळजी करण्यासारखी परिस्थिती असते. यामध्ये गर्भवेष्टन हे गर्भशयापासून वेगळे होते आणि बाहेर येऊ लागते अश्या वेळी बाळाच्या आणि आईच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अश्यावेळी डॉक्टर नैसर्गिक प्रसूतीच्या ऐवजी सी-सेक्शन प्रसूतीचा सल्ला देतात.

— दीर्घकाळ चालू असलेल्या प्रसूती कळा

जर एखादे वेळी महिलेला खूप वेळ जर कळा येत असतील पण मात्र त्या महिलेला इतर सुद्धा खूप त्रास हा होऊ शकतो . त्यामुळे तिची सहन करण्याची क्षमता हि संपू शकते . अश्या वेळी बाळाचा आणि आईचा जीव हा धोक्यात असतो. त्यामुळे वेळ ना घालवता प्रसूती करणे आवश्यक असते .

— बाळाचे वजन जर जास्त असेल तर 

जर बाळाचे वजन हे जर जास्त असेल तर त्या वेळी मात्र बाळाला सुखरूप रित्या बाहेर येण्यास खुप कालावधी लागतो. त्यामुळे कदाचित बाळाच्या आरोग्याच्या समस्या या निर्माण होऊ शकतात . किंवा श्वास घेण्याचा त्रास हा वाढू शकतो. त्यामुळे लवकर प्रसूती करून बाळाला रिकामे केले जाते .

— ओटीपोटाच्या आकारमानामुळे निर्माण होणारी गुंतागुत

जर बाळाचे शरीर हे जर स्त्रियांच्या ओटीपोटी पेक्षा खूप मोठे असेल तर मात्र त्यावेळी काळजी घेत  सीझेरिअन करावे लागते . जर बाळ एका ठराविक अंतरावर अडकले गेले असेल तर सुद्धा सोझेरिअन हे करावे लागते .