| |

बोचणारा मूळव्याध का होतो आणि तो कसा ओळखावा?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मुळव्याध हा आजार अत्यंत त्रासदायक आजार आहे. यात मलाशयामध्ये वा त्याबाहेरील नसांमध्ये सुज येते. यामुळे गुदाद्वारजवळ रक्त येणे, गुदाक्षेत्रात दुखणे व संडासच्या जागेवर आग होणे अश्या समस्या निर्माण होतात. अनेकदा आपल्याला हा आजार झाला आहे का नाही हे ओळखणे कठीण होऊन बसते. कारण बाहेरचे खाणे वा अति भडक पदार्थांचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ जाणवते. गैसमजापायी या समस्येला मूळव्याधीचे नाव दिले जाते. म्हणूनच आपण आज मूळव्याध ओळखता यावा म्हणून त्याची लक्षणे जाणून घेणार आहोत. यासह मूळव्याध होण्याची कारणे आणि आहारात करावयाचे बदलदेखील जाणून घेऊ खालीलप्रमाणे:-

० मूळव्याधीची लक्षणे – अनेकदा मूळव्याध कसा ओळखावा हे लक्षात येत नाही. अनेकदा मूळव्याध गंभीर अवस्थेत नसेल तर अगदी ४-५ दिवसात आराम मिळतो. परंतु आजार वाढण्याची किंवा वाढल्याची काही लक्षणे आहेत ती आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे:-
१) गुदाद्वार आणि त्याच्या आजूबाजूला कठोर गाठ वाटणे. ही गाठ दुखणे आणि रक्त येणे.
२) शौच केल्यानंतरसुद्धा पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहणे.
३) शौचालयादरम्यान जळजळ वाटणे, झोंबणे आणि रक्त येणे.
४) बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होणे.

० मूळव्याध होण्याची कारणे – डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मुळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे असंतुलित खानपान. अति तिखट व तेलयुक्त पदार्थांचे सेवन वा मांसाहाराचा अतिरेक यामुळे व्यक्तीला मूळव्याध होण्याची शक्यता असते. जाणून घ्या कारणे:-
१) दीर्घकाळ उभे राहून वा बसून काम करणे.
२) अत्याधिक वजन उचलण्याची कामे करणे.
३) अस्वच्छ पोटाची समस्या अर्थात पोट साफ होणे म्हणजेच बद्धकोष्ठता.
४) अधिक तळलेले व मिरचीचे आणि मसालेदार अन्नपदार्थ खाणे.
५) अति उष्ण पदार्थ खाणे.
६) महिलांमध्ये प्रसूती दरम्यान गुदाक्षेत्रावर अधिक दबाव येणे. पडल्याने देखील मुळव्याध उद्भवू शकते.
७) शारीरिक हालचाल कमी असणे.
८) धूम्रपान आणि मद्यपान करणे.

० मुळव्याध झाल्यास काय आहार घ्यावा?
– आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीचं आपल्या आरोग्याचे नुकसान करत असतात आणि मूळव्याध हा आजार देखील याचमुळे होतो. त्यामुळे मूळव्याध होऊ नये आणि झाल्यास आहार काय आणि कसा असावा हे जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) मूळव्याध असलेल्या व्यक्तीने जास्तीत जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. उदा. फळे, हिरव्या भाज्या.
२) जास्तीत जास्त पाणी पिणे. दररोज किमान ७-८ ग्लास पाणी प्यावे.
३) दैनंदिन आहारात मठ्ठा आणि ताक यासारखे थंड पदार्थ समाविष्ट करा.

महत्वाचे :-
– नियमित व्यायाम व प्राणायाम करा.
– अधिक वेळ एका जागी बसू नका वा उभे राहू नका.
– मूळव्याध असल्यास जंक फूड, फास्ट फूड, तळलेले आणि मिरची – मसालेयुक्त पदार्थ खाणे टाळा.