|

डांग्या खोकला का होतो?; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डांग्या खोकला हा सन संस्थेचा एक अत्यंत गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला व्हुपिंग, कफकिया पेरटसिस असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोडेटेला पटेसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यास अतितीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो. यामुळे अनेकदा रुग्णाला वास घेताना अधिक त्रास होतो. हा आजार होण्यासाठगी कोणतेही निश्चित वय असण्याची गरज नाही. कारण हा आजार कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. परंतु त्यातही नवबालक आणि लहान मुलांसाठी डांग्या खोकला अत्यंत घातक आजार ठरू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत डांग्या खोकल्याची लक्षणे, कारणे, निदान – तपासणी आणि उपचार – प्रतिबंधात्मक उपचार.

लक्षणे
– डांग्या खोकल्याच्या सुरुवातील सर्दी होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे आणि ताप येणे अशी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात.
– यानंतर २ आठवड्यानंतर सतत कोरडा खोकला येत राहणे.
-श्वास घेण्यास अडचण होणे.
– खोकल्यातून घट्ट देहके येणे.
– उलटी होणे.
– श्वास घेताना विशिष्ट आवाज येणे.

कारणे
– डांग्या खोकला हा बोडेटेला पटेसिस या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे होतो.
– तसेच पाणी वा हवा दूषित असल्यामुळेही हा आजार होत असतो.
– डांग्या खोकला हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. यामुळे हवेतून याचा सहज संसर्ग होतो.
– एखाद्या व्यक्तीला लागण झाली असेल आणि ती व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकली व खोकली अश्या वेळी रुमालाचा वापर न केल्यामुळे हवेत जिवाणू पसरतात आणि इतरांना याची लागण होते.

निदान व तपासणी
– डांग्या खोकल्याचे लक्षणांवरून निदान होण्यास मदत होते. याशिवाय छातीचा एक्स-रे, खोकल्यातील बेडक्याची किंवा घशातील स्रावांची तपासणी आणि रक्त तपासणी करून याचे निदान केले जाते.

उपचार
– डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेचा गंभीर सांसर्गिक रोग आहे. त्यामुळे याची लक्षणे जाणवल्यास कृपया डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून घ्यावे. कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये.
– डांग्या खोकला असल्यास उपचारासाठी डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधे देतील.
– शिवाय खोकला, ताप ही लक्षणे कमी करण्यासाठीही औषधे देतील.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
– डांग्या खोकला होण्यापासून बचाव करण्यासाठी नेहमी खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
– शारीरिक स्वच्छता ठेवावी.