How to sleep for good health?
|

दुपारी आपण का झोपू नये ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्याला जर दुपारी झोपण्याची सवय असेल तर ती सवय मात्र तुमच्या शरीराला फार घातक असते. दुपारी झोप घेणे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. ज्या लोकांचे शरीर हे थकलेले असते. त्याच लोकांनी दुपारी थोडा वेळ झोप घेणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही विनाकारण काही काम नाही म्हणून झोपता असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.

आयुर्वेदानुसार जर तुम्ही दिवसा झोप घेतली तर मात्र शरीरातील कफ वाढतो. सतत झोप घेतल्याने रक्ताभिसरणात अडथळे येतात. आपल्या शरीराच्या सगळ्या भागात रक्त पुरवठा करणे अवघड जाते. त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो. दुपारच्या वेळेत झोप घेतल्याने आळस हा जास्त निर्माण होतो. सर्दी-खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोडं, घश्याचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्या बद्दल जाणून घेऊया.

दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. मात्र न झोपता केवळ पडून रहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते. झोप आलीच तर थोडीशी डुलकी घेतलेली आपल्या शरीराला योग्य राहते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात, कफात संतुलन साधले जाते. त्यामुळे दुपारची झोप शक्यतो टाळली गेली पाहिजे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *