Sprouts
| |

कडधान्ये मोड आल्यानंतरच का खावी..?; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मोड आलेली कडधान्ये खाणे आरोग्यदायी आहे हे तर सारेच जाणतात. शिवाय स्प्राऊट्समुळे चयापचय व्यवस्थित होते. यातील प्रथिने पचायला सोपी असल्यामुळे ते खाणे आरोग्यदायी ठरते. कडधान्यांना मोड आल्यामुळे जीवनसत्वांची दुप्पट वाढ होते. यात प्रामुख्याने क जीवनसत्व मोड आल्यानंतर तयार होते. त्यामुळे कडधान्ये खायला हवी असे आपण अनेक आर्टिकल आणि आरोग्यविषयक लेखांमध्ये वाचले असेल. पण कडधान्ये मोड आणूनच का खावी..? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का.? जर याच उत्तर हो असेल तर अजिबात वेळ न घालवता या प्रश्नाचे उत्तर लगेच जाणून घ्या.

Sprouts

० कडधान्ये मोड आल्यानंतरच खावी..कारण,

० मोड आलेली कडधान्‍य खाण्याचे फायदे :-

१) मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो आणि त्यातील प्रथिने पचायला सहज आणि सोपी होतात.

२) कडधान्यांना मोड येताना त्याच्या सालीतील टॅनीन आणि फायटीक अॅसीडचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. यामुळे लोह आणि कॅल्शियमचे शोषण वाढून शरीराला फायदा होतो.

३) मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात. ज्यामुळे चयापचय जलद आणि व्यवस्थित होते.

४) कडधान्यांना मोड आल्याने त्यातील प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता वाढते. शिवाय प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द साथ यात तयार होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *