Sunday, January 1, 2023

पेट्रोलियम जेली असली तरीही जास्त प्रमाणात का वापरली जाते?

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । बहुतेक  सगळे लोक थंडीच्या दिवसांत पेट्रोलियम जेलीचा वापर हा आपल्या शरीरासाठी करताच. कारण आपले शरीर थंडीत खूप जास्त फुटले जाते.  त्वचा हि खराब दिसली जाऊ नये,  म्हणून आपण थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी व्हॅसलिन किंवा जेल हे वापरतो . थंडीत आपल्या शरीराला तडे हे खूप जास्त पडतात.  त्यापासुन   दूर  राहण्यासाठी  पेट्रोलियम पदार्थाचे  दुष्परिणाम असूनही याचा वापर हा केलाच जातो असे का ? ते जाणून घेऊया ….

पेट्रोलियम पदार्थाच्या  अतिवापराचे दुष्परिणाम बहुतेक लोकांना माहीतच नसतात. तर काहींना माहित असूनही ते वापरतात.अनेक वेळा असा विचार केला जातो कि, हे फक्त दोनच महिने वापरले तर असं काय आभाळ कोसळणार आहे? पण याची सवय लागली की आपण वर्षभर वापरतो. अनेक वेळा त्याच्या बरोबर आपण फाऊंडेशन चा पण वापर करतो. हे प्रॉडक्ट गोरे होण्यासाठी असले तरीही त्यामुळे आपली त्वचा हि खूप काळी पडू शकते. अनेक वेळा पेट्रोलियम पदार्थामुळे आपल्या चेहऱ्यावरची ओली हि टिकवून ठेवली जाते. त्यामुळे त्याचा वापर हा चेहऱ्यासाठी केला जातो.

ज्यावेळी आपण साबणाने आपली त्वचा धुतो तेव्हा त्वचेवरील नैसर्गिक तेल आपण धुवून टाकतो. अश्या वेळी आपण जर आपल्या शरीराला पेट्रोलियम जेली वापरली तर त्या तेलाची आपल्या शरीरातील पोकळी हि भरून निघण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीराच्या वरच्या भागात असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन हे होऊ शकत नाही. पेट्रोलियम जेली लावण्यापूर्वी आपले शरीर नेमके कसे आहे आणि त्वचा कश्या प्रकारची आहे याचा अभ्यास करूनच त्याचा वापर हा केला गेला पाहिजे. त्यावेळी मात्र आपली त्वचा कश्या पद्धतीने प्रतिक्रिया देते याचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे. ज्यांना त्वचेच्या समस्या जास्त प्रमाणात आहेत त्या लोकांनी पेट्रोलियम जेलीपासून दूरच राहिले पाहिजे.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...