towel

तुम्ही वापरत असलेल्या टॉवेल ची स्वछता का आहे महत्वाची ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या वापरात असणाऱ्या सगळ्या वस्तूंची स्वछता राखणे खूप गरजेचे असते. कारण जर तुम्ही तुमच्या वस्तू या स्वच्छ नाही ठेवल्या तर मात्र त्वचेचे विकार होऊ शकतात . काहींना दररोज वापरात असलेला टॉवेल धुण्याचा खूप कंटाळा करतात . पण हाच टॉवेल आपण बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरतो. जर दररोज वापरात एकच टॉवेल असेल तर त्यावेळी कमीत कमी आठवड्यातून दोनदा हा टॉवेल साफ करणे आवश्यक आहे.

— जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर त्यावेळी कोणाचाही म्हणजे हाताला येत तो टॉवेल वापरत असाल तर त्यावेळी कदाचित तुम्हाला  वेगवेगळ्या  आजाराला सामोरे जावे लागू शकते . किंवा चेहऱ्यावर पुटकुळ्या किंवा पिंपल्स या यायला लागतात .

— जर आपल्या त्वचेवर पिंपल्स असतील तर मर आपणही कोणाचा टॉवेल वापरू नये . किंवा कोणाला आपला टॉवेल वापरू देऊ नका . त्यामुळे पिंपल्स या अधिक वाढण्याची शक्यता असते .

— प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. काही जणांना याचा त्रास होत नाही. पण जर तुम्ही टॉवेल सतत धूत नसाल आणि तसाच वापरत असाल तरी देखील तुमच्या त्वचेला काहीऍलर्जी होण्याची दाट शक्यता असते.

— अस्वच्छ टॉवेलमुळे त्वचेला बुरशी येण्याची ही शक्यता असते.जर तुम्हाला आधीच पिंपल्स असतील आणि असा खराब टॉवेल वापरत असाल तर ती जखम चिघळते. ती जखम भरली नाही तर त्याला बुरशी सदृश्य डाग येण्याची शक्यता असते.

— अनेकांच्या घरात जेवण झाले कि , तोंड पुसण्यासाठी टॉवेल चा वापर केला जातो. पण अश्या वेळी जर तिखट तसेच टॉवेल ला राहिलेआणि नंतर हा टॉवेल दुसऱ्या कोणी वापरत असेल तर त्यामुळे त्याला तिखटाची ऍलर्जी हि होऊ शकते . त्यामुळे नेहमी टॉवेल धुवून वापरण्याचा प्रयत्न करा.