Why is the cold sore in the nose?

सर्दी नाकात का साचली जाते ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  वातावरणात बदल झाला कि , लगेच सर्दीच्या समस्या या वाढताना जाणवतात . सर्दी हि लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना होऊ शकते . ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे. त्या लोकांना मात्र वातावरणात थोडा जरी बदल झाला , किंवा काही वेळ धूळ आणि मातीत गेले तर त्यावेळी  सर्दी होते . थंडीत आणि पावसाळयाच्या दिवसांत नाकात सर्दी हमखास तयार होतेच . त्यामुळे सतत शिंकरावे लागते. त्या वेळी जर आपल्या कपाळाच्या खाली आणि डोळ्याच्या खाली ज्या मोकळ्या पोकळ्या असतात . तेथे सर्दी साठली जाते .

सर्दी औषध घेतल्यास 1 आठवड्यात आणि औषध न घेतल्यास 7 दिवसात बरी होते, असं म्हणतात. म्हणजेच हा विषाणूजन्य आजार असल्याने ती औषध घ्या किंवा वाट पहा, आपोआपच बरी होते. फक्त त्या काळात बरं वाटावं म्हणून गरम पाण्याने वाफ घेणे, तुळस-काळी मिरी-लवंग-जेष्ठमध यांचा काढा घेणे, निलगिरी तेलाचे थेंब रूमालावर घेऊन हुंगणे असे घरगुती उपाय करता येतात. त्यामुळे आपल्याला लगेच आराम मिळायला मदत होते .

घरगुती उपायांमध्ये जर आपण अंघोळ करत असू तर त्यावेळी मात्र थंड पाण्याने अंघोळ करा. थंड पाणी हे जितके जमेल तेवढा वेळ आपल्या तोंडात साठवून ठेवा. तोंडातील पाणी बाहेर फेकून देऊ नका. जेवढा वेळ ते पाणी पाणी तोंडात ठेवता येईल तेवढा वेळच ठेवणे गरजेचे आहे . कमीत कमी २ ते ३ महिने हा प्रयोग करा. त्यामुळे काही दिवसांतच आपली सर्दी हि दूर होऊ शकते . सर्दीच्या समस्या या दूर होण्यासाठी कमीत कमी काही दिवस वाफ घ्या . त्याने आपली सर्दी आपोआप आटायला सुरुवात होते . सर्दी हि एक कफाचा प्रकार असतो. त्यामुळे ती सुद्धा बाहेर पडणे आवश्यक आहे . सर्दी हि पूर्णतः कमी झाली कि मग फ्रेश झाल्यासारखे वाटते .