Why is the skin of the feet bad?
|

पायांची त्वचा का होते खराब ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  अनेकदा स्त्रियांचा नव्हे तर पुरुषांना सुद्धा टाचेच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. टाचा या सतत घाण असतील तर मात्र तुमचे सुंदर दिसणे सुद्धा काही कामाचे नाही. सौदर्य हे खूप सुदंर असले तरी शरीराचा प्रत्येक भाग हा चांगला स्वच्छ असणे सुद्धा गरजेचे आहे. कोणत्या कारणाने आपल्या पायांना खूप जास्त प्रमाणात भेगा पडतात त्याची कारणे पाहूया …

 

पायाला सतत ऊन लागणे—

सगळेच प्रत्येक सीझनमध्ये शूज घालतात असे नाही. शिवाय प्रत्येक कपड्यावर शूज चांगलेच दिसतात असे नाही . त्यामुळे साहजिकच आपण वेगवेगळ्या फॅशनचा चपला कपड्यांनुसार घालत असतो. अशा चपलांमुळे पायांना थेट उन लागते. पायांना सतत ऊन लागल्यामुळे तेथील त्वचा कालांतराने काळवंडते. आता आपण त्याला टॅन होणे असे म्हणतो. जर तुम्ही जास्त लक्ष दिले नाही तर पायाची त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे पायांना ऊन लागणे हे पायाची त्वचा खराब करण्याचे पहिले कारण आहे.

चपला लागणे—

मुलींना चप्पलांचे एक जोड थोडीच पुरते. प्रत्येक कपड्यावर वेगवेगळ्या चप्पल घेताना त्या सगळ्याच चपला पायांना आरामदायी असतात असे नाही. त्यामुळे त्या अनेकदा पायांना लागतात. शू बाईटमुळे पायांना जखमा होत असतात. त्यांच्यावर तात्पुरता इलाज आपण करतो. पण अशा चपला सातत्याने घातल्यामुळे पायांच्या जखमा बऱ्या होत नाहीत आणि पायांवरील डाग वाढत राहतात. शिवाय त्या जखमेवर डेड स्किन येत राहते.

पाय धुण्याचा कंटाळा—

अनेकांना पाय धुण्याचा कंटाळा असतो. बाहेरुन आल्यानंतर केवळ पायावर पाणी घ्यायचे असते. म्हणून अनेक जण पाय धुतात. बाहेर तुमच्या पायावर धूळ-माती बसत असते. ती तशीच चिकटून राहिली की, पायाची त्वचा खराब होते. पायाच्या त्वचेतील बदल तुम्हाला लगेच जाणवत नाही. पण कालांतराने तुमच्या पायाची त्वचा खराब होत जाते.

टाचा फुटणे—-

सतत पाण्यात काम केल्याने पायाच्या टाचा खराब होतात. जास्त वेळ पाण्यात काम केल्यास तेथील त्वचा पांढरी दिसू लागते. नखांजवळील त्वचा खूप वेळ पाण्यात राहिली की, अगदी वेगळीच दिसते. शिवाय सततच्या पाण्यातील कामांमुळे पायाला भेगा देखील पडतात. त्यामुळे देखील तुमची त्वचा खराब होते.