Why is the vaccine important in pregnancy?
|

गर्भारपणात लस का आहे महत्वाची ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । आपल्या दररोज च्या धावपळीत आपण आपल्या शरीराकडे लक्ष नाही दिले तरी चालू शकते. पण महिलांनी त्यांच्या गरोदर पणाच्या काळात आपल्या आहाराकडे आणि आपल्या तब्बेतीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. गर्भारपणात जर महिलांनी लस घेतली नाही तर मात्र त्यांना वेगळ्या आजारांना सामोरे जायला लागू शकते. गर्भारपणात लसीकरण जर नाही केले तर मात्र वेगवेगळे संसर्ग बाळाला होण्याची दाट शक्यता असते.

कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं

गर्भारपणात स्त्रीच्या संप्रेरकामध्ये बदल होत असतात. याकरिता पौष्टीक आहार, नियमित व्यायाम जितका मह्त्वाचा असतो तितकेच लसीकरणे देखील महत्त्वाचे असते. गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून तो रूबेला विषाणूमुळे होतो. यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते. इतकंच नाहीतर एखाद्या महिलेला गर्भावस्थेदरम्यान हेपेटायटीसचा संसर्ग झाला असल्यास जन्माच्या दरम्यान ते बाळालाही होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. यात टिटॅनस टॉक्साईड, हेपेटायटीस ‘बी’, रेबीज व्हॅकिन, डिप्थीरिया आणि इन्फ्लुएंझा लसींचा समावेश आहे. म्हणजे जर आईला एखादा आजार असेल तर तो बाळाला होण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक महिलेने गर्भ अवस्थेत असताना काही प्रमाणात लसीकरण घेणे आवश्यक असते.