Water
| | |

‘पाणी म्हणजे जीवन’ असे का म्हणतात..?; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डॉक्टर सांगतात नियमित शरीराला आवश्यक तेव्हढे पाणी प्यायल्यास बरेच फायदे होतात. म्हणून आपण पाणी पितो का..? तर नाही. आपल्याला जेव्हा आवश्यकता वाटते, घश्याला कोरड पडते आणि तहान लागते तेव्हाच आपण पितो. शाळेत असताना पाण्यावर बरेच निबंध तुम्ही लिहिले असतील. अगदी जल है तो जीवन है!, पाणी म्हणजे जीवन!, जल संजीवनी आणि असे बरेच विषय तुम्ही मुक्तपणे लिहिले वाचले असाल. पण कधीतरी तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल ना कि पाण्याला आपल्या आयुष्यात इतके महत्व का..? पाण्याला जीवन असे का संबोधले जाते..? तर याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. वेळ न घालवता लगेच जाणून घ्या.

० पाण्याला जीवन म्हणतात कारण..

मानवी जीवनाची व्याख्याच पाण्याशिवाय अपूर्ण आहे. मानवी शरीरातील ७०% भाग हा पाण्याचा आहे. कारण आपल्या स्नायूंमध्ये ७०% पाणीच असत. शिवाय शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे आपला मेंदू ज्यातील ८५% भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. आपले शरीर ज्या इंधनावर चालते ते म्हणजे आपले रक्त आणि आपल्या रक्तामध्ये ८० टक्के हे पाणी असते .

० नियमित किती प्रमाणात पाणी प्यावे..?

दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणे शरीराच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे तज्ञ सांगतात.

० पाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी पाणी अतिशय मदतयुक्त भूमिका निभावते. त्यामुळे कोणत्याही एका ऋतूत नव्हे तर प्रत्येक दिवशी शरीराला आवश्यक तेव्हढे पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीरातील अतिरिक्त मेद म्हणजेच चरबी कमी करण्यासाठी नियमित शरीराच्या गरजेइतके पाणी प्या. यामुळे वजन कमी करण्यासाठीदेखील फायदा होतो.

जर पोटाच्या कोणत्याही समस्या असतील जसे कि बद्धकोष्ठता तर हा त्रास दूर करण्यासाठी गरम पाणी जरूर प्या.

शरीरातील अनावश्यक आणि विषारी घटक शरीरातून बाहेर फेकण्याचे काम पाणी करते.

शरीरातील पेशी आपल्या आंतरक्रिया सुरळीत ठेवण्याचे मुख्य काम करत असतात. दरम्यान पेशीमध्ये ऑक्सिजन वहनाचे काम पाण्याद्वारे होते.

शरीरातील पाणी ४५% पर्यंत मलाशयाचा कर्करोग आणि ५०% पर्यंत मुत्राशयाचा कर्करोग बरा होण्यासाठी मदत करते. शिवाय ७०% स्तनाचा कर्करोग बरा करण्याची क्षमता पाण्यामुळे शरीरात निर्माण होते.