tomato

लालभडक टोमॅटो का असावा आहारात ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज एक तरी टोमॅटो असणे गरजचे आहे. लाल भडक टोमॅटो हे आहारात घेतल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. लाल कलर चे टोमॅटो आपले रक्त वाढवण्यास मदत करते. एका टोमॅटो पासून वेगवगेळ्या प्रकारच्या रेसिपीज तयार केल्या जातात आणि त्या आपल्या आहारात घेतल्या जातात. या वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घेतल्याने आपल्या प्रतिकार शक्तीत या वाढ होण्यास मदत होते.

टोमॅटो मध्ये वेगवेगळ्या  प्रकराची जीवनसत्व असते. टोमॅटोमध्ये मिनरल आणि व्हिटॅमिन असते . टोमॅटोमध्ये फायबर चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे पोटच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवत नाहीत .ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. त्या लोकांनी आपल्या आहारात टोमॅटोचा वापर करणे आवश्यक आहे . टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे डोळ्यांच्या समस्या या कमी प्रमाणात जाणवू शकतात. टोमॅटो मध्ये असलेले ऑक्सिडंटल घटक हे आपल्या शरीरावर आणि त्वचेवर परिणाम करतो.

टोमॅटोचा वापर आपण सर्रासपणे कोंशिबीरीत करतो तसंच तो सॅलडमध्येही करू शकतो. सॅलडमध्ये कच्चा टोमॅटो वापरताना त्याचं सालं काढू नका. कारण टोमॅटोच्या सालांमध्ये सर्वात जास्त पौष्टीक तत्त्व आढळतात. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं.टोमॅटोचं सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकतं. खरंतर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो कॉलेस्टॉल असतं, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज तुमचं पोट भरण्यास मदत होते.