| | |

संसर्गाची भीती कशाला? हा काढा प्या आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जरासं वातावरण बदललं, का मग ताप, सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य रोगांची जणू साथ पसरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांची भिती अधिक असते. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी दैनंदिन आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण पावसाळी हंगामात बाहेरचे अन्न खाणे संसर्गजन्य रोगांचे मूळ कारण आहे. त्यामुळे अश्या रोगांशी सामना करण्यासाठी सतत डॉक्टरकडे जाणे टाळा आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर करा. अनेक आयुर्वेदिक औषधी आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास सक्षम असतात. मात्र तरीही अनेक लोक त्यांचा वापर करत नाहीत. कारण या औषधांचा वापर कसा करायचा हे अनेकांना ठाऊक नसते. पण आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, जो अगदी सोप्पा आणि सहज बनवता येईल असा आहे. हंगामी रोगांशी लढण्यासाठी तुळस आणि हळद यांचे मिश्रण करून जो काढा तयार होतो. त्याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.
० साहित्य-
हळद १/२ चमचा हळद
तुळशीची पाने ८ ते १२
मध २ चमचे
लवंग ४
दालचिनी १ तुकडा
फिल्टर पाणी १ ग्लास

० कृती – एका पातेल्यात एक ग्लास स्वच्छ व शुध्द पाणी घाला. आता त्यात हळद, तुळशीची पाने, लवंग आणि दालचिनी घाला. यानंतर हे मिश्रण १५ मिनिटे उकळू द्या. हे पाणी गाळून कोमट करा. या मिश्रणाची चव वाढवण्यासाठी यात मध घाला. झाला तुमचा काढा तयार.

० वापर – रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि सर्दी किंवा फ्लूसारखे आजार बरे करण्यासाठी हा काढा दिवसातून २ ते ३ वेळा पिऊ शकता.

० फायदे-
१) मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा काढा अतिशय उत्तम पर्याय आहे.

२) हा काढा आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढण्यास करण्यास आणि आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो.

३) हा काढा बद्धकोष्ठता व अपचनाची समस्या दूर करतो.

४) हा काढा प्यायल्याने सर्दी आणि घशातील संसर्ग दूर होतो.