Why use wooden combs for hair?

केसांसाठी का वापरावेत लाकडी कंगवे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या केसांचा गुंता दूर करायचा असेल तर त्यावेळी केस विंचरण्यासाठी कंगवा याचा वापर केला जातॊ. आजकाल बाजारात उपलब्ध झालेल्या नवीन नवीन वस्तूंचा वापर  केसांसाठी सुद्धा केला जातो. केस सुकवण्यापासून ते केसांच्या नवीन नवीन स्टाइल करण्यासाठी सुद्धा कंगव्याचा वापर हा केला जाऊ शकतो. पण आजकाल नाव नवीन प्रकारच्या कंगव्याचा वापर करण्याऐवजी कोणत्या प्रकारच्या कंगव्याचा वापर करू शकतो ते जाणून घेऊया ….

लाकडी कंगव्याचे फायदे —

लाकडी कंगवे केसांसाठी आरामदायक असतात—-

लाकडी कंगवा हा लाकडासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असतो. तुमचे केस, स्काल्प आणि डोक्याची हाडे यांना लाकडी कंगवा वापरण्यामुळे आराम मिळतो. लाकडी कंगव्याने केस विंचरताना जास्त गुंता होत नाही अथवा गुंता पटकन सोडवण्यास मदत होते. लाकडी कंगव्यामुळे त्वचेच्या इनफेक्शनचा धोका कमी होतो.

 

तेल योग्य प्रमाणात मुळांपर्यंत पोहचते —-

लाकडी कंगव्याच्या साह्याने जर आपण केस विंचरले तर मात्र आपल्या केसांच्या मुळ्यांपर्यांत ते तेल पोहचायला मदत होते. त्यामुळे केसांचॆ वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे केस हे खूप छान वाढण्यास मदत होते.

लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते —-

नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे लाकडी कंगवा जास्त टोकदार नसतो. ज्यामुळे तुमच्या स्काल्पवर ओरखडे अथवा जखमा त्यामुळे होत नाहीत. उलट लाकडामुळे तुमच्या केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. त्यामुळे मेंदूच्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

लाकडी कंगव्याने केसांचा कोंडा हा दूर होण्यास मदत होऊ शकते —

आपल्या केसांमध्ये जर कोंडा यांचे प्रमाण हे जास्त असेल तर लाकडी कंगव्याच्या साह्याने केसांमधील कोंडा हा दूर होण्यास मदत होऊ शकते. कोंडा दूर झाल्याने केस गळणे यांचे प्रमाण कमी होत जाते.