wooden comb
| |

Wooden Comb | ‘हा’ एक कंगवा तुमच्या केसांचे ८० टक्के प्रॉब्लेम सोडवू शकतो; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । तुम्ही मुलगा असा व मुलगी, केस म्हटलं कि कान टवकारून ऐकणारच. कारण केस हा सर्वांच्याच अगदी जवळचा विषय आहे (Wooden Comb). तुमचे केस कितीही चांगल्या स्थितीत असले तरी त्यांची काळजी वाटणे काही थांबत नाही. आपल्याला टक्कल पडलं तर? असा प्रश्न प्रत्येकाच्याच डोक्यात कुठे ना कुठे असतोच.

Beautiful Hairs

बाला सारख्या चित्रपटांनी भले आपल्याला केसांविनाही आपण सुंदर दिसू शकतोच, सुंदरता केवळ बाह्य आवरणावर अवलंबून नाही हे सांगितलंय. पण अजूनही अनेकांसाठी लांब केस हे सुंदर असण्याचं आय कार्डच आहे जणू. पण चांगल्या केसांसाठी नेहमी महागडे हेअर ऑइल, ब्रॅण्डेड शॅम्पू अन नको तितकी त्यांची कॅअर करायलाच हवी असं नाही. तुमचा एक कंगवाही तुमचं निम्मं काम हलकं करू शकतो. होय, आम्ही आज तुम्हाला अशा एका कंगव्याबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस नेहमीच हेल्दी राहतील.

Hair Fall Reasons in Marathi

लांब, चमकदार आणि निरोगी केस हे सौंदर्याचा एक भाग आहेत. त्यामुळे केसांची निगा राखणे हि आपली प्राथमिक जबाबदारी आहे. Wooden Comb जितकी आपण शरीराची आणि त्वचेची काळजी घेतो तितकीच काळजी केसांचीही घेणे गरजेचे आहे. यासाठी शॅम्पू, बाथ क्लिप, पाणी, तेल आणि कंगवा अशा प्रत्येक गोष्टीची गुणवत्ता तपासून वापरणे गरजेचे आहे. म्हणून केशतज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केसांसाठी लाकडी कंगव्याचा वापर करावा.

पूर्वीच्या काळात नैसर्गिक तेलांचा आणि रंगाचा केसांसाठी वापर केला जाई. मात्र आता कृत्रिम रंग आणि रासायनिक ट्रीटमेंटमूळे केसांचे फार नुकसान होताना दिसून येत आहे. पूर्वी केस विंचरण्यासाठीदेखील नैसर्गिक लाकडाचा कंगवा वापरला जात असे. साहजिकच आधुनिकतेनुसार, पुढे सोयीप्रमाणे तसेच खिशाला परवडणारे प्लास्टिकचे कंगवे बाजारात आले. यामुळे लाकडी कंगव्यांकडे दुर्लक्ष होऊन त्याचा वापर कमी झाला. आजही बऱ्याच ठिकाणी शोभिवंत आणि युनिक असे लाकडी कंगवे विकत मिळतात.

HomeMade Hair Oil

तज्ञ सांगतात कि, केसांची योग्य निगा राखण्यासाठी कमीत कमीत केमिकल ट्रीटमेंट आणि प्रसाधने वापरावी. शक्यतो वापरूच नयेत आणि जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसाधने आणि साधनांचा वापर करावा. मुख्य म्हणजे लाकडी कंगव्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण पोहचवण्यासाठी मदत होते. म्हणूनच तज्ञ सांगतात कि, केस विंचरण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी लाकडी कंगवा वापरणे फायद्याचे आहे. चला तर जाणून घेऊया लाकडी कंगवे वापरण्याचे फायदे नेमके काय होतात आणि काय होतात? (Wooden Comb Benefits)

० केसांसाठी लाकडी कंगवा वापरल्यास होणारे फायदे (Wooden Comb Benefits)

१) केसांची चांगली वाढ होते – केसांना तेल लावून केस केस लाकडी कंगव्याने विंचरल्यास केसांच्या मुळांना व्यवस्थित मालिश होते. ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण केसांची मुले व्यवस्थित शोषून घेतात. यामुळे केसांची घनता आणि लांबी वाढू लागते. परिणामी केस गळण्याची समस्या दूर होते आणि केस घनदाट तसेच लांबसडक होतात.

२) केसांची कोंड्यापासून सुटका होते – जर तुमच्या केसात वारंवार कोंडा होत असेल इंफेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नियमित लाकडी कंगवा वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात. यामुळे हे इनफेक्शन टाळता येतं.

Tips For Healthy Hair प्लॅस्टिकच्या कंगव्याला कोंड्याचे कण चिकटून राहतात आणि दिवसेंदिवस इनफेक्शन वाढतं. याउलट लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांमधील कोंडा सहज केसांतून बाहेर टाकला जातो. म्हणून केसांसाठी लाकडी कंगव्याचा वापर करावा.

३) केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचते – लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांना लावलेले तेल केसांच्या मुळांपर्यंत जाते. ज्यामुळे केसांचे पूर्ण पोषण होते. शिवाय कंगव्याला लागलेले अतिरिक्त तेल लाकडी कंगव्यामध्ये मुरले जाते आणि पुन्हा केस विंचरताना केसांचा आणि मुळांना तेलाचा टच मिळतो. मात्र प्लॅस्टिक कंगव्याला तेल लागले असेल तर त्यावर धुळ आणि माती साचते. ज्यातून पुढे संसर्गाचा धोका निर्माण होतो. Tips For Healthy Hair

४) स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारते – नैसर्गिक घटकांपासून बनलेला लाकडी कंगवा टोकदार नसल्यामुळे स्कॅल्पचे नुकसान होत नाही. प्लॅस्टिकच्या टोकदार भागामुळे स्कॅल्पवर ओरखडे वा जखमा होतात. याउलट लाकडी कंगवा पुढून गोलाकार असल्यामुळे स्कॅल्पचा बचाव होतो.

दरम्यान केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. यामुळे लाकडाचे दात केसांच्या नाजुक मुळांना हळूवार मसाज करतात. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो आणि रक्तप्रवाह सुधारल्यामुळे केस तजेलदार दिसतात. Tips For Healthy Hair

५) केसांमध्ये गुंता होत नाही – लाकडी कंगवा हा लाकडासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असतो. ज्यामुळे केस, स्कॅल्प आणि डोक्याची हाडे यांना आराम मिळतो. दरम्यान लाकडी कंगव्याने केस विंचरताना जास्त गुंता होत नाही वा गुंता पटकन सोडवण्यास मदत होते. तसेच लाकडी कंगव्यामुळे त्वचेच्या संसर्गाचाही धोका कमी होतो.

० लाकडी कंगवा वापरताना काय काळजी घ्याल..? (Wooden Comb)

अनेक कारणांसाठी लाकडी कंगवा केसांच्या आरोग्यास फायदेशीर ठरतो. आजही बाजारात विविध प्रकारचे लाकडी कंगवे मिळतात. मात्र या कांगव्यांची खरेदी सावधपणे करावी. कारण अनेकदा लाकडी कंगव्याच्या नावाखाली प्लॅस्टिकचेच कंगवे विकले जातात. म्हणून लाकडी कंगवा वापरताना त्याची स्वच्छता राखा. तसेच केस ओले असताना केसांमध्ये लाकडी कंगवा फिरवू नका. लाकडी कंगवा ओला झाल्यास तो लवकर खराब होतो.