world health day
| |

जागतिक आरोग्य दिन विशेष : उत्तम जीवनशैली सर्वोत्तम आरोग्याचा सुवर्णमार्ग; आयुष्यमान भवः

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आरोग्याचा ध्यास हा ज्याला त्याला असतो. पण वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आरोग्याची हानी होते. त्यामुळे आजचा दिवस हा लोकांना आपले आरोग्य किती महत्वाचे आहे आणि ते कसे जपावे यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आजचा दिवस आपल्या आरोग्याला समर्पित. जगातील प्रत्येक सजीव घटकाला जागतिक आरोग्य दिनाच्या खूप शुभेच्छा!

आपण नेहमीच विविध आजार, रोग, संसर्गजन्य विषाणू आणि उपचार पद्धती, घरगुती उपाय यांसह आयुर्वेदाबाबत जाणून घेत असतो. पण आज आपण हे का जाणून घेतो हे जाणून घेण्याचा दिवस आहे. मित्रांनो, तुम्ही हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा अशा टॅगलाईन्स अनेकदा ऐकल्या असाल. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का..? तर याचा अर्थ असा कि आरोग्य हेच धन. असे सांगण्याचे कारण म्हणजे पूर्वी लोक शंभरी पार जगत होते. पण आजकाल कुणी शंभरी गाठणे नवलंच वाटते.

गेल्या काही काळात जीवनमान अश्या पद्धतीने घसरले आहे कि आरोग्याबाबत चिंता व्यक्त करणे सामान्य बाब वाटू लागली आहे. म्हणूनच आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक करत असलेल्या चुकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या समजल्या तर सुधारता येतील आणि निरोगी आयुष्य जगायला सुरुवात करता येईल.

दैनंदिन जीवनातील ‘या’ चुका आरोग्याचे नुकसान करतात

१) फिल्टर न केलेले अशुद्ध पाणी पिणे

दिवसभरातील सगळ्यात सामान्य चूक म्हणजे अशुद्ध पाणी पिणे.

तसेच नळातून येणाऱ्या पाण्यात पाईपमधील शिसे आणि क्लोरामाईन्सचे घटक असतात. शिवाय यात फार्मास्युटिकल औषधांचादेखील समावेश असतो. असे पाणी प्यायल्यामुळे आतड्यांचे नुकसान होते. भविष्यात मोठे आजारही होऊ शकतात.

२) फळे आणि भाजीपाला न धुता खाणे

बाजारातून आणलेली फळे आणि भाज्या न धुता खाणे म्हणजे आरोग्याशी खेळणे.

तज्ञांच्या सांगण्यानुसार, १० सेकंद फळे वा भाज्या धुण्यामुळे ९०% रोगजन्य घटक नष्ट होतात.

३) अपूर्ण आहार घेणे

अनेकांना फक्त चपाती, रोटी किंवा भाकरी खायला आवडते. तर अनेकांना भाताचे विविध प्रकार खायला आवडतात. तसेच काही जण फक्त शाकाहार करतात तर काही जण फक्त मांसाहार. यामुळे होत काय..?

४) डाएट सोड्याचे नियमित सेवन

फिटनेस फ्रिक लोकांमध्ये डाएट सोडा पिण्याचे भलतेच वेड आहे.

त्यामुळे डाएट सोडा पित असाल तर सावध व्हा.

५) एका ठिकाणी बराच वेळ बसून राहणे

यामुळे एकतर नियमित व्यायाम करा आणि एकाच ठिकाणी न बसता थोड्या थोड्या वेळाने शरीराची हालचाल करा.

६) खूप जास्त वा खूप कमी झोप घेणे

खूप जास्त झोप किंवा खूप कमी झोप या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी नुकसानदायीच आहेत.

कदाचित सर्वात त्रासदायक हे आहे की जे लोक जास्त झोपतात ते कमी वयात मरण्याची शक्यता असते.

७) स्कीनी जीन्स घालणे

याशिवाय स्कीनी जीन्स परिधान करणाऱ्या व्यक्तींचे पाय फुगतात किंवा त्यांचे पाय, बोटे, पोटऱ्या सुन्न होतात आणि मुंग्या येतात.

८) केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणे

तर इथाइल, मिथाइल आणि ब्यूटाइल सारख्या पॅराबेन्सचा वापर केलेली ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यामुळे ७५% स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.

९) झोपण्याआधी डिजिटल स्क्रीनचा वापर करणे

झोपण्यापूर्वी मोबाईलमध्ये डोकं खुपसणे, टीव्ही पाहत राहणे, गेम खेळणे, लॅपटॉपवर मुव्ही पाहणे अशी जर तुमची दिनचर्या असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे नुकसान करत आहेत.

१०) सोशल मीडियावर खूप वेळ घालवणे

सोशल मीडियामूळे जगणे अशक्य झाले आहे. याचा अर्थ असा की स्क्रोलिंग शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे.

यामुळे सामाजिक अंतर वाढते आणि आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलले जाते.

वर सांगितलेल्या अतिशय सर्वसामान्य चुका ज्या आपण रोज करत आहोत. ज्यामुळे आपण स्वतःच आपले आयुष्य हळूहळू संपवत आहोत. आज आरोग्य दिनादिवशी एव्हढेच सांगणे आहे कि, आयुष्य सुंदर आहे ते सुंदररित्या जगा. क्षणिक सुखासाठी भविष्य धोक्यात घालू नका.

संपूर्ण सजीव सृष्टीला जागतिक आरोग्य दिनाच्या निरोगी आणि सुदृढ शुभेच्छा! (७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन)