| |

जांभईवर राहत नाही नियंत्रण? मग या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खूप वेळ असंच बसून राहिलो आणि हाताला काही कामच नसेल, तर आपल्याला खूप कंटाळा येतो. या कंटाळ्याच प्रतिनिधित्व करते ती आ…आ..आ.. आई गं.. अर्थात जांभई. एकदा का जांभई आली कि पुढची काम सगळीच आळसावल्यासारखी होतात. अख्खा दिवस कसा मरगळल्यासारखा जातो. पण खरं सांगायचं झालं ना तर कंटाळा आला म्हणून जांभई येते हा समजच चुकीचा आहे. अहो खरंच. कारण जांभई येण्यामागे एक वेगळे आणि वैज्ञानिक कारण सिद्ध झाले आहे.

– शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर मेंदूला तशा सूचना दिल्या जातात आणि मग आपोआपच जांभई येते. असं बहुतेकदा होत कि आपण चारचौघात उभे आहोत कुणीतरी काहीतरी बोलत आहे आणि तेव्हाच आपल्याला जांभई येते. हे असं झाल्यानंतर आपल्यासोबत उभे असणारे बाकी आपल्याकडे असे पाहतात कि बस्स रे बस्स. म्हणूनच या समस्येपासून आपली सुटका कशी करून घ्यायची यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया जांभई न येण्यासाठी काय काय शक्कल लढवता येईल.

१) आईस टी /कॉफी प्या – आईस टी किंवा आईस कॉफी यांपैकी कोणतेही एक पेय जांभईचे प्रमाण कमी करते. शरीराचे तापमान कमी झाल्यास जांभई कमी येते असा एका संशोधनानुसार सिद्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे थंडगार पेय प्या आणि जांभई देण्याची सवय सोप्प्या रीतीने आटोक्यात ठेवा.

२) बर्फाची थंड बॅग – साधारण १ ते २ मिनिटांसाठी डोक्यावर बर्फाची थंड बॅग ठेवा. यामुळे काही काळ शरीरात थंडावा राहण्यास मदत होते परिणामी जांभईवर नियंत्रण राहते.

३) दीर्घ श्वास घ्या – शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर जांभईचे प्रमाण वाढते. त्यामुळे नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारा श्वास बाहेर टाका. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. दीर्घ श्वास घेणे हा जांभई रोखण्यासाठी सोप्पा पर्याय आहे.

४) मनसोक्त हसणे – इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाईड अ‍ॅन्ड बेसिक मेडीकल रिसर्चनुसार, सतत जांभई येत असल्यास वेखंड भन्नाट विनोदी व्हिडिओ पहा. याच कारण असं कि जांभईचे प्रमाण कमी करण्यासाठी मनसोक्त वा दिलखुलास हसणे हा अगदीच प्रभावी उपाय आहे.

५) एसीच्या थंडगार हवेत बसा – जर तुम्हाला असह्य जांभई येत असेल आणि सलग येत असतील तर एकदम सोप्पं पर्याय म्हणजे आजुबाजूचे वातावरण एसीच्या मदतीने थंड करा आणि किमान १० मिनिटे एसीत बसून रहा. यामुळे कोणतीही आणि कितीही लांब चालणारी मिटिंग असेल तरीही जांभई येणार नाही.