गर्भावस्थेत योगा करताना घ्यावयाची काळजी
हॅलो आरोग्य ऑनलाईन । महिलांना गर्भावस्थेत असताना योगा करावेत कि नको करावेत हा मोठा प्रश्न असतो. अनेक वेळा गर्भावस्थेत असताना पहिले तीन ते चार महिने जास्त काळजी घ्यावी लागते. अनेक पदार्थ पहिल्या काही दिवसांमध्ये खायला दिले जात नाहीत. पहिल्या तिमाहीमध्ये उभ्याने करावयाची योगासने करावीत. कारण त्याने पायांना बळकटी मिळते,रक्ताभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणारे पेटके बंद होतात.
महिलांच्या गर्भाश्यात पहिल्या काही दिवसांमध्ये बाळ तयार व्हायला सुरुवात होत असते. दुसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही आसने करण्याचा वेळ कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. ब; बाळाची हालचाल लक्षात घेऊन साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यायाम करावेत .
काही तसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठवड्यापासून ते चौदाव्या आठवड्यापर्यंत सराव करू नये. कारण हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणू नये. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. ओटीपोटावर अजिबात तणाव येऊ देऊ नये. उलटे होणे पूर्णपणे टाळावे.
गर्भावस्थेत करावयाची योगासने
काही खाली दिलेली योगासने महिलांना गर्भावस्थेतील लक्षणे, सहज आणि सुलभ बाळंतपण आणि बाळंतपणानंतर जलद पूर्ववत होणे यात मदत करतात. पोटावर दबाव पाडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेच्या काही भागांमध्ये करू नयेत. खाली दिलेली सर्व आसने तुम्ही करायलाच पाहिजे असे नाही.
-सुखासन
-खांदे उचलणे
-मानेचे व्यायाम
-उज्जयी श्वसन
-संपूर्ण यौगिक श्वसन
-भ्रामरी
-मार्जरासन
-उज्जयी सोबत वज्रासन
-पर्वतासन
-कोनासन-१
-कोनासन-२
-त्रिकोणासन
-वीरभद्रासन
-पश्चिमोत्तानासन
-नाजूक फुलपाखरू
-शवासन
-योगनिद्रा
-नाडी शोधन प्राणायाम
-ध्यान