You can also use nail paint

असेही वापरू शकता नेलपेंट

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या नखांना सुदंरता आणि सुबकता येण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंट चा वापर हा केला जातो. नेलपेंट मुळे आपल्या नखांना अजून आकर्षकपणा यायला मदत होते. त्यामुळे नेलपेंट हे वापरले जाते . पण अगदी नेलपेंट हे फक्त नखांसाठी वापरले जाते असे नाही कारण नेहमी विकत आणले गेलेले नेलपेंट हे पूर्णपणे वापरले जाते असे नाही . अशा वेळी त्या नेलपेंट चा वापर इतर नवीन गोष्टींसाठी सुद्धा केला जाऊ शकतो . कसे ते जाणून घेऊया …….

चिटकवण्यासाठी केला जाऊ शकतो —

अनेक वेळा आपल्या घरात फेविकॉल नसेल तर त्यावेळी आपण इकडे तिकडे धावपळ करत असतो. पण त्या वेळी आपल्या घरात एखादी सुकलेली नेलपेंट सुद्धा आपण एखादी वस्तू चिटकवण्यासाठी केली जाऊ शकते . बाहेर फेविकॉल घेऊन येण्यापेक्षा घरात असलेल्या नेलपेंट चा वापर हा एखादी वस्तू चिटकण्यासाठी केला जाऊ शकतो.

कपड्यांचे धागे निघण्यापासून सुटका मिळते —

लेगिंग्ज असो वा कोणता ड्रेस यामधून बऱ्याचदा धागे बाहेर येत असतात. हे धागे खेचले तर तो ड्रेस फाटण्याची शक्यता असते. अशावेली तुम्ही त्या कपड्याच्या रंगांच्या नेलपेंटचा वापर करून कोटिंग करू शकता. त्यामुळे कितीही नवीन कापड असेल तरी मात्र धागे हे अजिबात निघणार नाहीत .

जखम किंवा भाजले असेल तर —–

तुम्हाला जर अचानक लागलं आणि रक्त येऊ लागलं तर क्लिअर नेलपेंटचा एक लेअर त्याठिकाणी तुम्ही लावा. रक्त लगेच थांबेल. तुम्हाला जर तुमच्या त्वचेवर अगदी जोरात खाज येत असेल तरीदेखील तुम्ही हा नेलपेंटचा उपाय करून पाहू शकता. जर तुम्हाला काही प्रमाणात भाजलं असेल तर त्यावर कव्हरिंग म्हणून नेलपेंटचा वापर करू शकतो. त्यामुळे वरच्या भागाचे कातडे हे सुरक्षित राहू शकते .