potato

रताळ्याच्या मदतीने तयार करू शकता फेस पॅक

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात जर रताळ्याचा वापर केला तर आपल्याला ऊर्जा मिळते . वाढत्या वयात आपल्याला सुरकुत्या आणि त्वचेवरील डाग यापासून दूर राहायचे असेल तर अशा वेळी मात्र आपल्या चेहऱ्यासाठी रताळ्याच्या फेस पॅक चा वापर करू शकतो. अनेक महिला आपण सुंदर दिसावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल युक्त प्रॉडक्ट चा वापर करतो. पण त्यामुळे कदाचित वाईट परिणाम सुद्धा आपल्या चेहऱ्यावर होऊ शकतात. अशा वेळी कश्या पद्धतीने फेस पॅक तयार करू शकता ते जाणून घेऊया ….

रताळे आणि जायफळ —

रताळे हे खाण्यासाठी वापरले जाते . तसेच चेहऱ्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो. जायफळ हे लहान मुलांसोबत मोठ्या लोकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे . चेहऱ्यासाठी वापरताना त्याच्यामध्ये काही प्रमाणात बटाटा आणि जायफळ पावडर आणि गुलाबाच्या पाण्याचा वापर करून जर मिश्रण बनवले तर ते आपल्या चेहऱ्यासाठी लाभकारक ठरते .

जायफळ याची पूड तयार करून घ्या . त्याच्यामध्ये बटाटा उकडलेला एकत्र मिक्स करून घ्या . त्याच्यामध्ये गुलाब पाणी टाकून ते मिश्रण एकत्र करून घ्या . त्यानंतरचा ते तयार झालेले मिश्रण हे आपल्या चेहऱ्यासाठी लावू शकता . कमीत कमी २० मिनिटे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर ते थंड पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवा . काही वेळातच तुमचं चेहरा हा सुंदर दिसायला मदत होऊ शकते . ते मिश्रण तयार करताना जर त्यामध्ये हळद टाकली तर सुद्धा आपल्या सौदर्यात वाढ होण्यास मदत होऊ शकते .