या घरगुती वस्तूंच्या मदतीने बनवू शकता सॅनिटायझर
हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्या सगळीकडे कोरोनाचे वातावरण आहे. त्या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे . दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या हि वाढतच चालली आहे . त्यामुळे प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर कमीत कमी आपले हात , पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी जवळपास सगळेजण सॅनिटायझर चा वापर करत आहेत . पण जास्त अल्कोहोल असलेली सॅनिटायझर वापरले तर मात्र त्वचेच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. असा वेळी जास्त अल्कोहोल नसलले सॅनिटायझर आपण घरी सुद्धा तयार करू शकतो . कसे ते जाणून घेऊया …
कोरोनापासून वाचण्यासाठी दररोज च्या वापरात असलेला सॅनिटायझर हा घरगुती पद्धतीने तयार करून वापरू शकता. कोरोनापासून वाचण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या साबणाच्या साह्याने हात स्वच्छ करणे गरजेचे आहे . केमिकल युक्त सॅनिटायझर वापरल्याने त्वचेच्या समस्या या वाढून .आपल्या हातांच्या साली या निघू शकतात. त्यामुळे सॅनिटायझर वापरण्याऐवजी काही प्रमाणात घरगुती पद्धतीने तयार केलेले द्रव्य वापरले तर ते फायदेशीर असणार आहे .
घरगुती पद्धतीने बनवा सॅनिटायझर —
— एका मोठ्या भांड्यात काही प्रमाणात पाणी घ्या.
— त्याच्यामध्ये काही प्रमाणात अल्कोहोल चे थेंब टाका.
— त्याच्यामध्ये काही प्रमाणात टी ऑइल यांचे थेंब टाका.
— त्याच्यामध्ये लिंबाचा आणि कोरफडीचा रस टाका .
— त्यानंतर ते सारे मिश्रण हे ऐका चमचा च्या साहयाने व्यवस्थित मिक्स करा.
— ते सगळे मिश्रण हे एका बाटलीमध्ये भरून ते दररोज वापरण्यास सुरुवात करा .