Wednesday, January 4, 2023

या घरगुती वस्तूंच्या मदतीने बनवू शकता सॅनिटायझर

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  सध्या सगळीकडे कोरोनाचे वातावरण आहे. त्या  काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे  खूप गरजेचे आहे . दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या हि वाढतच चालली आहे .   त्यामुळे प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर कमीत कमी  आपले हात , पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे.    कोरोनापासून दूर राहण्यासाठी जवळपास  सगळेजण  सॅनिटायझर चा वापर करत आहेत .  पण  जास्त अल्कोहोल असलेली सॅनिटायझर वापरले तर मात्र  त्वचेच्या समस्या या  निर्माण होऊ  शकतात.  असा वेळी  जास्त अल्कोहोल नसलले सॅनिटायझर  आपण   घरी सुद्धा तयार करू शकतो . कसे ते  जाणून घेऊया …

कोरोनापासून वाचण्यासाठी  दररोज च्या वापरात  असलेला  सॅनिटायझर हा  घरगुती पद्धतीने  तयार करून वापरू शकता.  कोरोनापासून  वाचण्यासाठी  सतत कोणत्या ना कोणत्या साबणाच्या साह्याने हात स्वच्छ करणे गरजेचे आहे . केमिकल युक्त सॅनिटायझर वापरल्याने त्वचेच्या समस्या या वाढून  .आपल्या हातांच्या साली या निघू शकतात. त्यामुळे सॅनिटायझर वापरण्याऐवजी काही प्रमाणात घरगुती पद्धतीने तयार केलेले द्रव्य वापरले तर ते फायदेशीर असणार आहे .

घरगुती पद्धतीने बनवा सॅनिटायझर —

— एका मोठ्या भांड्यात काही प्रमाणात पाणी घ्या.

— त्याच्यामध्ये काही प्रमाणात अल्कोहोल चे थेंब टाका.

— त्याच्यामध्ये काही प्रमाणात टी ऑइल यांचे थेंब टाका.

— त्याच्यामध्ये लिंबाचा आणि कोरफडीचा रस टाका .

— त्यानंतर ते सारे मिश्रण हे ऐका चमचा च्या साहयाने व्यवस्थित मिक्स करा.

— ते सगळे मिश्रण हे एका बाटलीमध्ये भरून ते दररोज वापरण्यास सुरुवात करा .


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...