nailpent

नेलपेंटचे  ‘हे’ रंग  तुमच्याकडे असायलाच हवेत

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते . त्यासाठी प्रत्येकजण आपल्या त्वचेची  काळजी घेत असते . अगदी नखांपासून ते केसांपर्यंत सगळ्या शरीराची काळजी हि घेतली जाते . अगदी नखांची सुद्धा खूप काळजी  घेतली जाते . त्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर हा आपल्या नखांसाठी केला जातो. पण त्यावेळी एका ठराविक पद्धतीच्या नेलपेंट चा वापर जर आपल्या नखांसाठी केला तर मात्र आपले लुक हे अजून खुलून दिसायला मदत होऊ शकते. कोणते रंग निवडावे यासाठी काही टिप्स

निवडताना पारदर्शक पद्धतीची नेलपेंट निवडावी —

स्वच्छ, सुंदर आणि चमकदार नखे दाखवण्यासाठी नेलपेंटचा हा शेड तुमच्याकडे असायला हवा. नखांना दोन ते तीन कोट लावल्यानंतर तुमची नखे यातून उठून दिसतात. शिवाय कोणत्या रंगावर कोणती नेलपेंट असा प्रश्न देखील यामध्ये येत नाही. ट्रान्सफरंटमध्येही दोन शेड्स असतात. एक थोडी पिवळ्या रंगाकडे झुकणारी असते तर एक क्रिस्टल क्लिअर असते. तुम्ही क्रिस्टल क्लिअर निवडलीत तर उत्तम. तसेच यामधून नखाचा एक उत्तम प्रकारचा शेप हा दिसून येतो.

न्यूड रंग —–

या रंगाची सध्या जोरात चालती आहे . कारण हा रंग जर निवडला तर मात्र कोणत्याही कपड्यांसाठी हा रंग शोभून दिसतो. वेगवेगळ्या रंगाची कपडे घातली तर त्यावर हा रंग मात्र उठून दिसायला मदत करते . सगळ्या कपड्यावर चालत असल्याने या रंगाच्या नेलपेंट ला जास्त पसंती देण्यात आली आहे . तुमची नखे खराब झाली असतील तरीही या रंगामुळे सगळं काही माफ असे होऊन जाते. या शेड्समध्ये ब्रँडनुसार थोडाफार फरक पडत असेल. तर तोही पडत नाही .

हॉट रेड —

हा जो रंग आहे . कोणत्याही प्रकारच्या ट्रॅडीशन कार्यक्रमासाठी याचा वापर हा केला जातो. त्यामुळे सौदर्य हे अजून खुलून दिसायला मदत होते . सौदर्य वाढवताना जर तुम्ही अगदी साडी किंवा येते नवीन ड्रेस चा वापर करणार असाल तर त्यावेळी हा रंग कपड्यांबरोबर अगदी उठून दिसायला मदत होते. हा रंग लावताना साधारण काही प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते . कारण जर सलग हा रंग लावत असला तर नखांवर पॅचेस यायला सुरुवात होते . त्यामुळे कमीत कमी दोन कोट्स चा शेड कमीत कमी आपल्या नखांसाठी दिला गेला पाहिजे .