| |

केशराचे फायदे जाणाल तर चकितच व्हाल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगात अनेक देश व त्या देशांत अनेको राज्य आहेत. या प्रत्येक ठिकाणी केशराचा वापर केला जातो. केशराला काही ठिकाणी कुंकुम आणि जाफ्रान या नावांनीदेखील ओळखले जाते. रंगाने लाल असलेले केशर एखाद्या द्रव्यात मिसळले कि त्याचा रंग पिवळा होतो. मुळात ह्याची चव कडू आणि तिखट असते. शिवाय त्याचा वास अत्यंत तीव्र असतो.

केशर शुष्क तसेच गरम प्रवृत्तीचे असते. यामुळे ते वात, कफ आणि पित्तनाशक मानले जाते. महत्वाचे असे कि केशर जगातील सर्वात महागडा मसाला आहे. काश्मिरी केशर हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय व फायदेशीर केसर मानले जाते. हे केशर अत्यंत बहुगुणी आहे. लिंग किंवा वय काय? याच्याशी काहीही संबंध नसून ते प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात केशराचे फायदे:-

१) सौंदर्य – केशराच्या सुकलेल्या भागात व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सिडेंट जास्त प्रमाणात असतात. हे चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात. त्याचे अँटी बॅक्टेरिया आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या समस्या तसेच मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डागदेखील पुसत करते. यासाठी केशर स्वच्छ पाण्यात भिजवा आणि नंतर त्यात दोन चमचे हळद घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासाने धुवून चेहरा स्वच्छ करा.

२) स्मरणशक्ती – केशराचे सेवन केल्याने मेंदूची गती तीव्र होते. शिवाय वृद्ध व्यक्तीच्या मेंदूत अॅमायलोइड बीटा तयार होण्यास प्रतिबंध करून अल्झायमर आणि कमकुवत स्मृतीतून आराम मिळतो. मुलांचे मन निरोगी आणि बुद्धिमत्ता गतिशील ठेवण्यासाठी आपण केशराचे दूध त्यांना पिण्यास देऊ शकता.

३) थंडीमध्ये आराम – सर्दी झाल्यास केशराचा वापर अत्यंत लाभदायक ठरतो. कारण मुळात केशराची प्रवृत्ती अतिशय गरम असते. या व्यतिरिक्त त्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सर्दी आणि थंडीसोबत दोन हात करायला मदत करते.

४) मासिक पाळीचा त्रासात आराम – अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान विविध त्रास जाणवतात. तर या त्रासापासून आराम मिळण्यासाठी केशराचा वापर होतो. शिवाय प्री – मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) दरम्यान त्रास कमी करण्यातदेखील केशर फायदेशीर आहे. यासाठी एक चिमूट केशर घालून दुधाचे सेवन केले असता त्याचा अत्यंत लाभ जाणवतो.

५) पुरुषांमधील शारीरिक दुर्बलता दूर करते – केशर मेल हॉर्मोनला नियंत्रित ठेवते. शिवाय केशराचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्याचा धोका दूर होतो. केशरात व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते. अशा परिस्थितीत पुरुषांनी त्यांच्या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी केशराचे सेवन करणे अतिशय लाभदायक आहे.