अंड्याच्या टरफलाचे फायदे जाणाल तर आश्चर्यचकित व्हाल; जाणून घ्या

0
258
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. जी आरोग्यासाठी गरजेची असतात. अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्हीही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अंड संपूर्णरित्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर मित्रहो अंड्याचे टरफल जे आपण सहसा फेकून देतो त्याचाही आपल्या आरोग्याला १००% फायदा होतो. होय. तुम्ही अगदीच बरोबर वाचताय. जसे अंडी आपल्या आरोग्याची काळजी घेतात तसेच अंड्याचे टरफल आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतात. विश्वास बसत नाहीये? मग जाणून घ्या अंड्याच्या टरफलाचे फायदे :-

– अंड्याचे टरफल त्वचेच्या समस्या दूर करतात. हे आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. यासाठी अंड्याचे टरफल सुकवून त्याची बारीक पावडर बनवा आणि ही पावडर कशी वापरावी हे खालीलप्रमाणे जाणून घ्या:-

१) अंड्याच्या टरफलाची पावडर, मध आणि लिंबू रस – त्वचेवरील डाग आणि मुरूम दूर करण्यासाठी अंड्याच्या टरफलाची पावडर घेऊन त्यात २ चमचे मध आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळा. हे व्यवस्थित मिसळून याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. पुढे १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

२) अंड्याच्या टरफलाची पावडर आणि कोरफड – अंड्याच्या टरफल पावडरमध्ये कोरफड जेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवा आणि यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. ही पेस्ट नियमित वापरल्याने तुमची त्वचा डीहायड्रेट होणार नाही.

३) अंड्याच्या टरफलाचा हेअर मास्क – केसांचे आरोग्य राखण्यासाठी अंड्याचे टरफल पावडर आणि दही मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट म्हणजेच तुमच्यासाठी हेअर मास्क असेल. हा हेअर मास्क ४५ मिनिट केसांना असाच राहुद्या. नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. हा हेअर मास्क लावल्याने तुमचे केस मजबूत आणि जाड होतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here