Your diet your observation

तुमचा आहार तुमचे निरीक्षण

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज वेगवेगळ्या जीवनसत्वाचा समावेश असणे गरजेचे आहे . कारण आहारात जर योग्य घटकांचा समावेश झाला नाही तर मात्र आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण दयावे लागते. आजारांपासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी आपल्या शरीराची काळजी हि आपणच घेतली पाहिजे . आणि त्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश हा केला गेला पाहिजे. असे झाले तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढून आजरांच्या समस्या  दूर होतील .

आज आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टींतून अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारले गेले पाहिजेत. त्यानुसार आपल्या आहाराच्या आणि आरोग्याच्या बाबतीत आपण किती काळजीवाहू आहोत हे लगेच लक्षात येऊ शकते. त्यामुळे तुमच्या आहाराचे निरीक्षण हे तुम्ही योग्य रित्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारा कि , तुम्ही तुमचा आहार हा योग्य वेळेत घेता का ? या प्रश्नाचे उत्तर जवळजवळ ९० टक्के लोकांकडून नाही हेच येईल कि , कारण कोणीही योग्य वेळेत जेवण करत नाहीत . त्यामुळे आरोग्याच्या समस्या या जाणवायला सुरुवात होते.

आपल्या आहारात दररोज कमीत कमी ३ ते ४ पदार्थ असणे आवश्यक आहे . त्या पदार्थांमुळे आपल्या प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच आहारात योग्य पाण्याचा म्हणजे कमीत कमी ३ ते ५ लिटर नॉर्मल पाणी असणे आवश्यक आहे . उपवासाचे प्रमाण हे कमी असले पाहिजे. फक्त उपवासाच्या दिवशी आपण आपल्या आहारात फळांचा वापर हा केला जाऊ नये. इतर दिवशी पण दररोज एक फळांचा वापर हा केला जावा.