| |

नैराश्य येण्यास आपल्याच सवयी कारणीभूत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच ताण तणाव आणि डिप्रेशन या शब्दांशी परिचित आहोत. याचाच मराठी शुद्ध भाषेत नैराश्य असा उल्लेख केला जातो. नैराश्य हि एक अशी समस्या आहे जी कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकते. संपूर्ण जगभराच्या तुलनेत आपल्या भारतात नैराश्याचे प्रमाण १५.९% जास्त आहे. मनोवैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, गेल्या काही दशकांपासून देशातील नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. खरतर नैराश्याची अनेक कारणे आहेत. पण ती नेमकी कोणती हि अनेकांना माहित नसतात. नैराश्य हि एक भावना आहे जिचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मुख्य म्हणजे नैराश्य भावनेची उत्पत्ती होण्यास बाहेरील घटक नव्हे तर आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात. आज आपण याच सवयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आपल्या त्या सवयी ज्यांमुळे आपण नैराश्याच्या प्रभावाखाली येतो.

१) उठण्या – बसण्याची चुकीची पद्धत
– मनो वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, आपली उठण्या बसण्याची पद्धत देखील आपल्या भावनांवर परिणाम करत असते. त्यामुळे स्वतःची सकारात्मक कल्पना जागृत ठेवायची असेल तर यासाठी नेहमी सरळ आणि ताठ बसावे. उठतेवेळी मन खाली वाकवून उठू नये. कारण या उलट केलेल्यूए क्रियांमुळे शरीर मरगळ शोषून घेते आणि याचा आपल्या भावनांवर परिणाम होतो. त्यामुळे, यापुढे जर कधीही चिंता वाटली तर आधी आपल्या उठण्या बसण्याच्या स्थितीत बदल करा आणि ताठ बसण्याचा प्रयन्त करा.

२) कामात टाळाटाळ करणे
– कामाबाबत आळशी असणे किंवा काम असूनही चालढकल करणे, टाळाटाळ करणे यामुळे कित्येकदा चांगल्या संधी निघून जातात. परिणामी आपण ठरवलेल्या गोष्टी साध्य करण्यात अडथळा येतो आणि यामुळे आत्मविश्वास तसेच आत्म सन्मानाला धक्का पोहचतो. परिणामी त्या व्यक्तीस नैराश्य येते. त्यामुळे शक्यतो आपली काम वेळेत पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजे नैराश्याचा सामना करावा लागणार नाही.

३) स्मार्टफोनचा अति वापर
– स्मार्टफोन कितीही सोयीस्कर असला तरीही आजकाल हा एक रोग होऊ लागला आहे. कारण स्मार्ट फोनमधील दररोजचे नवनवे फिचर आपल्याला नैराश्य, चिंता आणि निद्रानाश यांकडे ओढू पाहतात. एकतर नवे खेळ, डिजिटल स्क्रीनवर चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे यामुळे झोप लागत नाही आणि सोशल मीडियावरील नवनवे व्हिडीओ कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक दृष्टिकोनास वाढीव देतात. असे संशोधकांचे म्हणणे आहे.

४) सोशल मिडीयाचा अति वापर
– सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण आपल्या प्रिय जणांच्या संपर्कात राहत असतो. मात्र या नादात आपण आपला बराच मौल्यवान वेळ वाया घालवत असतो. कारण माणूस समोर आल्यावर आपण बोलत नसलो तरी मोबाईलवर तासनतास बोलतो. तसेच सोशल मीडियावरील अनेक अपडेट्स नैराश्य, मत्सर आणि एकटेपणाची भावना वाढविण्यास कारणीभूत ठरतात. उदा. तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात आणि मग मित्रांनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये जर तुम्ही चांगले दिसत नसाल तर ते पाहून तुम्हाला उदास किंवा निराश वाटतं. त्यामुळे काही काळासाठी सोशल मीडियापासून एक अंतर ठेवा.

५) वाईट नात्याचा अनुभव
– गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, बॉस, कलिग किंवा एखादी कुटुंबातील व्यक्ती अशा कोणत्याही नात्यात जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकरित्या न पेलणारे वाईट अनुभव येत असतील तर वेळीच अश्या नात्यांपासून दूर व्हा. कारण जर एखाद्या नात्यात भावनिकरीत्या दुखावले जाणे आपल्या मनात नाकारात्मकतेला जन्म देतात. परिणामी आत्महत्येसारखी भावना मनात येते. त्यामुळे हातातून वेळ जाण्याआधी वेळेवर मात करा.

६) व्यायामाचा कंटाळा
– व्यायाम केल्यामुळे शरीरातील फील गुड हार्मोन सक्रिय राहतात. त्यामुळे मुड नेहमी फ्रेश राहतो. पण काही लोकांना व्यायामाचा अतिशय कंटाळा असतो आणि हेच त्यांच्या अंगलट येते. व्यायामाचा अभाव देखील नैराश्य येण्याचे कारण असू शकते. त्यामुळे नियमित व्यायाम करा. सुरुवातील केवळ ३० मिनिटे चालणे किंवा जॉगिंग करा. यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही आरोग्यावर मत करू शकाल.