| |

तुमचा स्मार्टफोन स्मार्टली तुमचं आरोग्य करतोय खराब; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भ्रमणध्वनी म्हणा नाहीतर मोबाईल तो आजकाल इतका समर्थ झालाय कि त्याच्यासमोर माणसाची बुद्धी चालेनाशी झाली आहे. त्याच झाली असं कि एकवेळ खाणंपिणं देऊ नका पण मोबाईल माझा नेऊ नका अशी अवस्था आजकाल प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे उठताना फोन, बस्तान फोन, जेवताना फोन, झोपताना फोन. आपल्या संपूर्ण दिनचर्येत फोनपेक्षा जास्त आणि फोनपेक्षा अधिक असं दुसरं काहीच उरलेलं नाही. निश्चितच एका क्लीकवर आपण जगातील कुठल्याही कोपऱ्यात संपर्क साधू शकतो. शिवाय मोबाईलच्या नवनवीन फीचरमुळे आपणही आधुनिक विश्वात पदार्पण करीत आहोत. आता हे सगळं कितीही मान्य असलं तरीही मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आपण दुर्लक्षित करू शकत नाही.

निश्चितच आपल्या आयुष्यात स्मार्टफोनची गरज आहे. पण गरज आरोग्यापेक्षा मोठी नक्कीच नाही. मोबाईलमुळे आपलं आरोग्य बिघडतं आहे हे कितीही अमान्य केलात तरी हेच सत्य आहे. अनेक तज्ञ मोबाईलचे साईड इफेक्ट वारंवार सांगत असतात. पण ऐकू ते आपण थोडीच. फोनच्या डिजिटल स्क्रीनला सतत स्क्रोल केल्याने मान आणि डोळ्यांचे आजार उद्भवतात. याशिवाय मानसिकतेवर देखील परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया मोबाईलमुळे नेमके काय काय आजार उद्भवतात आणि आपले आरोग्य पणाला लागते, खालीलप्रमाणे :-

१) डोळ्यांचे विकार – डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजुक अवयव आहे. त्यामुळे मोबाईलची डिजिटल स्क्रीन आपल्या डोळ्यांचे नुकसान करते. स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामूळे डोळ्यांची ब्लू स्क्रीन खराब होते. शिवाय स्मार्टफोनची स्क्रीन फोटोरिसेप्टरलादेखील नुकसान पोहचवते. परिणामी तीव्र डोकेदुखी, अंधूक दिसणे, डोळे कोरडे पडणे, दृष्टिदोष होणे आदी व्याधी सुरु होतात. यासाठी आपला स्मार्टफोनच जबाबदार असतो हे वेळीच जाणून घ्या आणि डोळ्यांना विश्रांती देत जा. कोणतीही किरणे सोडणारी वस्तू डोळ्यांपासून किमान २० मीटर अंतरावर ठेवा आणि डोळ्यांची वारंवार तपासणी करा.

२) कार्पल टनल – दिवसभरात ५ तासांपेक्षा अधिक स्मार्टफोनचा वापर कार्पल टनलची समस्या निर्माण करतो. यामुळे हातात वेदना होणे, डोकं सुन्न पडणे, तळ हाताला मुंग्या येणे आदी समस्या उदभवतात. याकरिता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३) पाठीचा कान दुखावणे – स्मार्टफोनचा अति वापर करणे पाठीसाठी त्रासदायक असते. मोबाईल वापरताना दोन्ही हात सतत एकाच दिशेत स्थिरावलेले असतात यामुळे चेता संस्थांवर परिणाम होताना दिसतो. परिणामी पाठदुखीचा त्रास वाढतो, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे.

४) त्वचेचे नुकसान – अनेक ऑनलाइन अभ्यासात आणि अनेक तज्ञांच्या संशोधनानुसार असे स्पष्ट झाले आहे की, स्मार्टफोन हा विविध प्रकारचे कीटक आणि विषाणू यांचे घर आहे. त्यामुळे स्मार्टफोन अति वर केला असता त्याच्या माध्यमातून विषाणू थेट आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात आणि आपल्या त्वचेचे नुकसान करतात.

५) निद्रानाश – डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपल्या मनोवस्थेसाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी आपापल्या शरीराला पुरेसा आराम मिल्ने आवश्यक आहे. यासाठी आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते. परंतु स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बहुतांश नागरिकांना निद्रानाशाची समस्या उद्भवली आहे.

६) मानसिक ताण तणावात वाढ – स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूवर ताण आणि मनावर तणाव वाढतो. शिवाय मोबाईलचा अतिवापर आणि इंटरनेटवर तासनतास सर्च इंजिन वापरल्याने आपल्या आरोग्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे आपण स्वत:साठी काही नियम घालून घेणे अत्यंत गरजेचे आहे.