Weight Gain Foods

Weight Gain Foods | वजन वाढवण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ ५ पदार्थांचा समावेश नक्की करा

Weight Gain Foods | काही काही लोक असे असतात, त्यांची तब्येत खूपच लहान असते. आणि ते वजन वाढवण्याचा खूप प्रयत्न करतात. परंतु काहीही खाल्ल्याने त्यांचे वजन वाढत नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. परंतु तब्येत वाढण्यासाठी तेवढे पौष्टिक अन्न खाणे देखील गरजेचे असते. अगदीच फास्ट फूड खाऊन आपली तब्येत वाढत नाही, तर आज आम्ही तुम्हाला नाश्त्याचे अशी काही प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास तुम्हाला मदत होईल. याने तुमचे वजन देखील वाढेल आणि शरीर देखील तंदुरुस्त राहील.

दही आणि सुका मेवा | Weight Gain Foods

सुका मेवा दह्यात घालून नाश्त्यात खाऊ शकतो. यामुळे पोट तर भरतेच पण वजनही वाढते. हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही दही घेऊन त्यात बदाम, काजू, अक्रोड आणि शेंगदाणे टाकू शकता. त्यात मधही घालता येतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दह्यामध्ये काही हेल्दी बिया टाकूनही खाऊ शकता.

हेही वाचा- Intermittent Explosive Disorder | तुम्हालाही लगेच राग येत असेल तर आताच सावध व्हा! असू शकतो ‘हा’ मानसिक आजार

साबुदाणा कटलेट

साबुदाण्यामध्ये जास्त कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी साबुदाणा कटलेट खाऊ शकतो. साबुदाण्याचे कटलेट खाल्ल्याने शरीराला पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि हेल्दी कार्ब्स मिळतात. हे ग्लूटेन मुक्त देखील आहे.

चीज ऑम्लेट

अंडी आणि चीज दोन्ही शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने देतात. प्रोटीन खाल्ल्याने स्नायू तयार होण्यास मदत होते, यासोबतच या प्रोटीनचा परिणाम वजन वाढण्यावर दिसून येतो. अंड्याचे ऑम्लेट बनवून त्यात चीज स्लाईस टाकून खा.

केळी शेक

आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत केळीचा उल्लेख नक्कीच होतो. त्यामध्ये कर्बोदके, चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. एक ते दीड केळीमध्ये दूध घालून शेक बनवून सकाळी प्या. या केळीच्या शेकमध्ये सुका मेवाही घालता येतो.

पनीर परांठा

हेल्दी प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्ससह हा नाश्ता वजन वाढवण्यास मदत करतो. पनीर भरून परांठा बनवायचा आहे. हा हेल्दी पराठा पोट भरतो आणि चवीलाही छान लागतो.